file photo 
मराठवाडा

परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी घराघरात वाढतेय दूश्मनी- सेलू तालूक्यात ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी) : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीसाठी (ता. १५) जानेवारी रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी गावागावत कोणत्या वार्डातून कोणाला उभे करायचे याची चाचपणी सुरू झाल्याने गावातील पुढारी आपल्या फायद्यासाठी घराघरात भांडणे लावण्याचे काम करतांना दिसत आहेत. त्यामूळे घरातली मंडळीच आपली दूश्मन झाली की काय असा विचार घरातील कुटूंब प्रमुखांना पडला आहे.

तालुक्यात होत असलेल्या ६७ ग्रामपंचायतीच्या  निवडणूकित ३१ ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने गिरगाव, चिकलठाणा ( बु.), देऊळगाव ( गात ),हातनूर,हादगव ( पावडे ),खादगाव ( भाबट ),गव्हा, गुळखंड, चिकलठाणा ( खु. ), वाई,बोथ, शिराळा, गोमेवाकडी, पिंपळगाव आदी ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे.

यासाठी २०५ वार्डातून ५१९ सदस्य निवडले जाणार आहेत.यासाठी ( ता.१५ ) डिसेंबर रोजी यादी प्रसिध्द झाली असून ( ता.२३ ) डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज स्विकरण्यात येणार आहेत.तर ( ता.१५ ) जानेवारी— २०२१ रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी ग्रामपंचातीचे पॅनल प्रमुख चांगलेच कामाला लागले आहेत.तालुक्यातील काही विद्यमान व माजी पदाधिकार्‍यांनी गावपातळीवर आपले वजन शाबुत राहावे यासाठी जोरदार तयारी सूरू केल्याचे दिसत आहे. गावात वास्तव्यास असणार्‍या गोरगरीब मतदारांचा निवडणूक  झाल्यावर तब्बल पाच वर्षे विचार न करणारे त्यांच्या सुख दूखात केंव्हाच सहभागी न होणारे.केवळ आपले पोट भरण्यासाठी गाव सोडून शहराच्या ठिकाणी राहणार्‍या गावातील मतदारांना ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी त्यांचे मत आपल्याच पारड्यात घेण्यासाठी गाव पातळीवरचे पुढारी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला की, त्यांची आस्थेने विचारपूस करून वेळ प्रसंगी मतदरांची संख्या पाहून आर्थिक मदत करणार असल्याचे बोलून दाखवत असतांना गावागावात दिसत आहेत.

भावाभावत दूश्मनी वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत आपल्या गावातील कोणत्या वर्डातील मते आपल्याला पडणार आणि कोणते मते विरोधकांना पडतील याचे गणित जुळवतांना गाव पुढारी व्यस्त आहेत.जे मते आपल्या उमेदवारांना पडणार नाहित त्यांच्या घरातील अन्य मतदारांना आपल्या जवळ करण्याचा फंडा पुढारी करित असल्याने घराघरात भावाभावत दूश्मनी वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT