Vice Chancellor Dr. Indra Mani sakal
मराठवाडा

Parbhani : मानवाच्‍या उन्‍नतीचा शेतकरीच केंद्रबिंदू ; कुलगुरू डॉ. इंद्र मणी

मंगरूळ येथे शेतकऱ्यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट देऊन संवाद

सकाळ वृत्तसेवा

परभणी : शेती विकास आणि शेतकरी कल्‍याण यात शासन, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ आणि स्‍वत: शेतकरी हे महत्त्वाचे खांब असून, सर्वांनी एकत्रित कार्य केल्‍यास शेतकरी बांधवांची मोठी प्रगती शक्‍य आहे. कोरोना रोगाच्‍या काळात संपूर्ण जगात कृषी क्षेत्राची ताकद सर्वांनी अनुभवली आहे. कृषिक्षेत्रानेच देशाची अर्थव्‍यवस्‍थेस व मानवी जीवनास तारले आहे. मानवी समाजाच्‍या उन्‍नतीचा शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे, हे सिद्ध होते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ता. ८ नोव्‍हेंबर रोजी एकाच दिवशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी संपूर्ण मराठवाड्यातील ६० पेक्षा जास्‍त गावांत जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. सदरील उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी मानवत तालुक्‍यातील मंगरूळ येथे शेतकऱ्यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट देऊन संवाद साधला.

कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक भारतीय किसान संघाचे सरसंघटनमंत्री दादा लाड, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, प्रगतशील शेतकरी अशोक दशमाने, मधुकर जाधव, तालुका कृषी अधिकारी प्रदिप कच्‍छवे, रेशीम शास्‍त्रज्ञ डॉ. सी. बी. लटपटे, डॉ. अनंत लाड, गुलाब शिंदे, रघुवीर नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उत्‍पादन वाढीत बियाणे, तंत्रज्ञान महत्त्वाचे

कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्‍हणाले की, पीक उत्‍पादन वाढीत शुध्‍द बियाणे, दर्जेदार कृषी निविष्‍ठा सोबत सुधारित पीक व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाची जोड आवश्‍यक आहे. अनेक शेतकरी स्‍वत: शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. प्रयोगशील शेतकरी दादा लाड यांनी विकसित केलेले कापूस लागवड तंत्रज्ञान अनेक शेतकरी स्‍वत: अवलंब करून या तंत्रज्ञानाची उपयुक्‍तता अधोरेखित केली आहे. डॉ. देवराव देवसरकर यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठ विकसित विविध वाण आणि विद्यापीठ प्रकाशनाबाबत माहिती दिली. प्रास्‍ताविक प्रदिप कच्‍छवे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका तंत्र सहायक योगेश पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT