parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani : कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या; जिंतूर शहरातील घटना

यावर्षी पाऊस कमी पडल्याने विलास रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली.

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरात एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणा त्यातच प्रापंचिक प्रश्न या विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील घटना रविवारी दुपारनंतर शहरातील पाटील विहीर परिसरात घडली. विलास रामराव रोकडे असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

यावर्षी पाऊस कमी पडल्याने विलास रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली.त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत राहत असत त्यातच घरसंसार, मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न तसेच औषधाची उधारी यासारखे अनेक प्रश्न समोर उभे ठाकले असल्याच्या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळपास घेऊन मरणाला कवटाळले.

नातेवाईकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,त्यांच्या पश्चात आईवडील,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.या घटनेमुळे

घरातील कर्ता पुरुष गेल्याने रोकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे. बातमी लिहीपर्यंत घटनेची नोंद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT