File photo 
मराठवाडा

धक्कादायक : परभणी आढळला कोरोना बाधीत पहिला रुग्ण

गणेश पांडे

परभणी : २१ दिवसांचे पहिले लॉकडाऊन सुरळीत पार पाडल्यानंतर गुरुवारी (ता. १६ एप्रिल २०२०) कोरोना विषाणु बाधीत रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. पुण्याहून आलेल्या एका २१ वर्षीय युवकाला याची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. त्यामुळे इतके दिवस ग्रीन झोनमध्ये असलेला परभणी जिल्हा एकदमच ऑरेंज झोनमध्ये गेला आहे.

कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर त्यापासून परभणी जिल्हा त्यापासून दुर होता. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे परभणी जिल्हा आता तरी सेफ झोनमध्ये होता. पंरतू अचानकच गुरुवारी एका २१ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. परिणामी, परभणी शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हा युवक पुणे येथून 11 एप्रिल 2020 रोजी पुण्याहून परभणीला पायी आला होता. परभणीला आल्यानंतर तो शहरातील औद्योगिक परिसरातील एक काॅलनीत वास्तव्यास होता. त्याला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले होते. 

परंतू,  गुरुवारी त्याचा आहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणुने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्दी, खोकल्याच्या तक्रारीमुळे त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल गुरूवारी प्राप्त झाल्याबरोबर वैद्यकीय अधिका-यांनी त्या रुग्णांची स्वतंत्र अशी व्यवस्था केली असून त्यांच्यासह वैद्यकीय निगराणी ठेवून आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

कुटुंबियांची तपासणी होणार
त्या २१ वर्षीय युवकाच्या कुटुंबियांची तपासणी होणार असल्याची माहिती हाती आली असून, यासंदर्भात आरोग्य विभागाने अधिक तपशील दिला नाही. त्या युवकाचे नाव, त्याचा पत्ता, भाग वगैरे बाबत गुतप्ता बाळगली जाणार आहे.

औद्योगिक परिसर सिल
जिल्हयात पहिला कोरोनाचा रुग्ण परभणी शहरातील औद्योगिक परिसरात आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. ज्या औद्योगिक परिसरात हा रुग्ण आढळला आहे. तो संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार दुप्पट होणार की फक्त ३१ % वाढ ? जाणून घ्या फिटमेंट फॅक्टरचं संपूर्ण गणित

Uddhav Thackeray : धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; ठाकरे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Selu Traveler Accident: ट्रॅव्हलरची टिप्परला मागून धडक; गुजरात येथील १७ प्रवासी जखमी; रमणा फाट्याजवळ अपघात

तापसीच्या एका वक्तव्याने कंगना भडकली? ‘सस्ती कॉपी’ म्हणत पुन्हा तापसीला डिवचलं! नंतर पोस्ट केली डिलीट

Crime: रस्त्याकडेला उभं राहून नागरिकांवर नको त्या कमेंट्स, जाब विचारताच मोठा वाद; तरुणांच्या हाणामारीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT