Parbhani gram purchase target Increased farmer movement result
Parbhani gram purchase target Increased farmer movement result sakal
मराठवाडा

परभणी : हरभरा खरेदीचे उदिष्ट वाढविले

सकाळ वृत्तसेवा

परभणी : हरभरा खरेदीचे उदिष्ठ संपल्याने राज्यातील हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू, अजूनही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात हरभरा शिल्लक असल्याने केंद्र शासनाने सुधारित खरेदीच्या उदिष्ठात वाढ केली आहे.

राज्यात हरभरा पिकांची खरेदी करण्यासाठी केंद्र सरकाने हमीभावाने खरेदी केंद्र सुरु केले होते. राज्यात हमीभावाने हरभरा (चना) खरेदीसाठी केंद्र शासनाने ता. १७ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रानुसार एकूण ६ लाख ८९ हजार २१५ मेट्रीक टन उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार ता. १ मार्च २०२२ पासून प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात आली आहे. या अतंर्गत ता. २९ मे २०२२ पर्यंत ३ लाख ६७ हजार ९६९ शेतकऱ्यांकडून ६७ लाख १३ हजार ५३५ क्विंटल हरभरा (चना) खरेदी करण्यात आला आहे.

राज्यात तिसऱ्या आगाऊ अंदाजाच्या ३२.८३ लाख मेट्रीक टन अपेक्षित उत्पादनाच्या आधारे ता. ३० मे २०२२ च्या पत्रान्वये केंद्र शासनाने ७ लाख ७६ हजार ४६० मेट्रीक टन सुधारित उद्दीष्ट निश्चित केले आहे. खरेदीचा कालावाधी ही ता. १८ जुन २०२२ पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुसार यापूर्वी निश्चित केलेल्या उत्पादकतेप्रमाणे शेतकऱ्याकडून हरभरा (चना) खरेदी करण्यात यावा असे आदेश राज्याच्या पणन विभागाचे सहसचिव डॉ.सुग्रीव धपाटे यांनी सोमवारी, ता. ३० मे रोजी दिले आहेत.

परभणीत झाले होते आंदोलन

हरभरा खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने ज्या शेतकऱ्यांकडील हरभरा शिल्लक आहे. त्याची मोठी गोची झाली होती. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी पेडगाव (ता.परभणी) येथील राष्ट्रीय महामार्गावर ता. २८ मे रोजी चना छोले आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेतली गेली. त्यामुळे आता परत हे खरेदी केंद्र सुरु होऊन शेतकऱ्यांचे हरभरा पिक हमीभावाने खरेदी केले जाईल अशी आशा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा हरभरा उत्पादक शेतकरी संतोष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT