परभणी : कोरोना विषाणु संसर्गामुळे देशातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या चार महिण्यापासून भक्तांना मंदिरात जावून देवाचे दर्शन घेण्याचा योग आलाच नाही. या श्रावणात तरी मंदिरे खुली होतील अशी आशा धरून बसलेल्या भगवान भोलेनाथाच्या भक्ताची निराशाच झाली. मराठवाड्यातील प्रसिध्द असलेले परभणीतील पारदेश्वर मंदिरांचे दरवाजे श्रावण सोमवारी (ता. २७) भक्तासाठी बंद होते.
परभणी शहरात कोरोनाचा कहर आता वाढत चालला आहे. पहिल्या टाळेबंदी पासून ते तिसऱ्या टाळेबंदीपर्यंत कोरोनाचा परभणी जिल्ह्यात शिरकाव नव्हता. परंतू चौथ्या टाळेबंदीनंतर परभणीतील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५०० च्याही पुढे सरकला आहे. अश्या बिकट परिस्थितीतून जिल्ह्यातील नागरीक मार्गक्रमण करत आहे. प्रशासनाची तारेवरची कसरत पहावयास मिळत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये जिल्ह्यातील मंदिरे ही भक्तांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील श्री पारदेश्वर महादेव मंदिरात नित्योपासना व पुजा अर्चा जरी सुरु असली तरी भक्तांना मात्र भगवान भोलेनाथाचे मुखदर्शनही घेता आले नाही. किमान श्रावण महिण्यात तरी या मंदिराचे दरवाजे उघडतील व देवाचे दर्शन घेता येईल या आशेवर असणाऱ्या भक्तांच्या पदरी निराशाच पडली.
मंदिर उघडण्यास परवानी नाही
श्रावण महिण्यात मंदिर उघडतील असे सर्वांना वाटत होते. परंतू प्रशासनाकडून त्याची परवानी देण्यात आलेलीच नाही. त्यामुळे मंदिर कसे उघडणार असा प्रश्न मंदिर समितीने उपस्थित केला. या मंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिण्यात दररोज शेकडो भाविक येतात. श्रावण सोमवारी तर ही संख्या हजारात जाते. त्यामुळे या मंदिरासमोर छोटे -मोठे व्यवसायीक देखील स्वताची दुकाने लावतात. परंतू यंदा या व्यवसायीकांना देखील मंदिर बंदीचा फटका बसला आहे.
आज केवळ संकल्पच सोडले
दरवर्षी श्रावणातील सोमवारी श्री पादरेश्वर मंदिरात १५० ते २०० अभिषेक केले जातात. परंतू यंदा कोरोना विषाणु संसर्गामुळे हे सर्व अभिषेक बंद ठेवण्यात आले आहे. परंतू ज्या भक्तांनी अभिषेकांची नोंदणी पूर्वीच केली आहे अश्या लोकांचे सोमवारी (ता.२७) संकल्प सोडण्यात आले व नित्य पूजा करण्यात आली. जेव्हा प्रशासन मंदिर उघडण्यास परवानी देईल तेव्हाच मंदिर सर्व सामान्य नागरीकांसाठी उघडले जाईल.
- शिवकुमार पुरे, सेवेकर, श्री. पारदेश्वर मंदिर, परभणी
संपादन - प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.