Parbhani News sakal
मराठवाडा

Parbhani News: महावितरण विरोधात धडक मोर्चा

शेती पंपाकरिता दिवसाची वीज द्यावी आदी मागण्या मोर्चेकरांनी केल्या

सकाळ वृत्तसेवा

पूर्णा : ‘एक दिवस आपल्या शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी’ ही टॅगलाईन घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व महावितरणकडून होणाऱ्या सततच्या त्रासा विरोधात बुधवारी (ता.२८) विविध पक्ष संघटनांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. (Parbhani News)

शहरातील टी पॉईंटपासून मोर्चास प्रारंभ झाला. नंतर मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. यावेळी नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. ३ फेज व १ फेज फिटर वेगवेगळे करण्यात यावे. ग्रामीण भागातील भारनियमन रद्द करावे. शेती पंपाची सक्तीची वीज बिल वसुली बंद करावी. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. शेतकऱ्यांना त्रास देवून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या अभियंता श्री. वसमतकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, ज्या भागात विद्युत दाब कमी येतो, त्या भागात अतिरिक्त रोहीत्राची व्यवस्था करावी.

शेती पंपाकरिता दिवसाची वीज द्यावी आदी मागण्या मोर्चेकरांनी केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे, युवकचे तालुकाध्यक्ष गजानन अंबोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रताप कदम, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर पारवे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक बोकारे, स्वराज्य संघटनेचे साहेबराव कल्याणकर, मनसेचे शहराध्यक्ष गोविंद ठाकर, मंगेश पारवे, गजानन धवन, तुकाराम लोखंडे, पुंडलिक जोगदंड, दयानंद कदम, गंगाधर बुचाले, रामा बुचाले आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT