file photo 
मराठवाडा

परभणी : वांगी गावात पोलिसांची मोठी कारवाई; अवैध वाळू उपसा करणारी दोन कोटीची वाहने जप्त

गणेश पांडे

परभणी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वांगी (ता. मानवत) येथे सुरु असलेल्या अवैध वाळू उपश्यावर रविवारी (ता. चार) सायंकाळी सहाच्या सुमारास छापा मारत दोन पोकलेन, जेसीबी मशीनसह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मानवत तालुक्यातील वांगी येथे अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार यांनी ही बाब जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना सांगितली. श्री. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत पवार, फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, विष्णू भिसे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी वाळू उपश्यासाठी वापरण्यात येत असलेले दोन पोकलेन, एक जेसीबी मशीन, पाच टिप्पर, सात ट्रॅक्टर, एक लोडर असा अंदाजे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली.

जिल्हाभरात वाळू उपश्याचे अवैध काम

जिल्हाभरात वाळू उपश्याचे अवैध काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतू यावर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होतांना दिसत नाही. गेल्या काही दिवसापासून पोलिसांकडून असे छापे मारण्याचे काम सुरु असले तरी महसुल प्रशासना त्या- त्या तालुक्यातील वाळू उपश्यावर लक्ष देत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषता पाथरी, सोनपेठ, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातूनही वाळूची चोरटी वाहतुक होत असते. यातून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT