market cotton Parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani : कापसाला ९ हजार १०० बाजार भाव

कापूस खरेदी प्रारंभाप्रसंगी प्रेरणा समशेर वरपूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेश नागरे

परभणी : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ता. २१ नोव्हेंबरपासून खासगी व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. खरेदीदारामार्फत कमाल ९ हजार १०० रुपये भाव मिळाला. तर किमान आठ हजार ९३० रुपये दर मिळाला.

कापूस खरेदी प्रारंभाप्रसंगी प्रेरणा समशेर वरपूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. टीएमसी मार्केट यार्डात जवळपास २५ वाहने आली आहेत. खरेदीदारांमार्फत कापसास किमान ८ हजार ९३० रुपये तर कमाल ९ हजार १०० व सर्वसाधारण ८ हजार ९७० रुपये भाव देण्यात आला. टीएमसी मार्केट यार्डात कापूस जाहीर लिलावापूर्वी मार्केट यार्डात सर्वप्रथम कापूस घेऊन येणाऱ्या प्रसादराव टेकाळे (रा. जलालपूर), सदाशिव नाईक, गंगाधरराव मोरे, वसंतराव देशमुख (रा. साडेगाव), सचिन दंडवते, मुंजा कदम, सुभाष सामाले, देवानंद राऊत, अविनाश पुके (रा. टाकळी कु.), संतोबा पुंजारे, जलालपूर,

अनंत देशमुख (रा. टाकळी कु.) या ११ शेतकरी बांधवांचा तसेच कापूस खरेदीदार हरीश कत्रुवार, अजय सरिया, बालुसेठ शर्मा, सुभाष अंबिलवादे, विनोद जाजू, ओमप्रकाश डागा यांचा बाजार समितीचे उपसभापती दिलीपराव आवचार, सदस्य सोपानराव आवचार, गणेशराव घाटगे, रावसाहेब रेंगे, चंद्रकांतराव पांगरकर, संदीप भंडारी, रमेशराव देशमुख, शामराव इंगळे, फैजुल्ला खान पठाण व सल्लागार सुरेश तळणीकर यांच्या हस्ते रुमाल, टोपी, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT