sanjay jadhav sakal
मराठवाडा

Parbhani : मेडिकल कॉलेजसाठी ३५ प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या

खासदार जाधव यांनी घेतली आयुक्तांची भेट, जूनपासून प्रवेशाचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

परभणी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ मनुष्यबळासाठी सोमवारी (ता.१३) खासदार संजय जाधव यांनी मुंबईत राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या घेतलेल्या भेटीनंतर त्यांनी तातडीने येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३५ तज्ज्ञ प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत. यामुळे आगामी वर्षापासून येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेचा मार्ग सुकर झाला आहे.

आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रतिनियुक्त्यांचे आदेश काढताना संबंधित महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना सदरील प्राध्यापकांना प्रतिनियुक्तीसाठी तातडीने कार्यमुक्त करावे, असेही म्हटले आहे.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांच्या जागा नव्याने भरण्यासाठी प्रयत्न सुरू होते. प्राध्यापकांच्या जागा भरण्यात आल्याशिवाय आगामी शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया येथील महाविद्यालयात सुरू होणे अशक्य होते.

ही बाब लक्षात घेऊन खा. संजय जाधव यांनी सोमवारी मुंबईत आयुक्त डॉ. म्हैसेकर यांची भेट घेऊन तज्ज्ञ प्राध्यापकांच्या जागा भरण्यासंदर्भात चर्चा केली. त्यावर डॉ. म्हैसेकर यांनी याबाबतचा प्रस्ताव अधिष्ठाता यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील अन्य वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांना प्रतिनियुक्त्या देणे शक्य

असल्याचे नमुद करीत त्याबाबतचे आदेशही संचलनालयाच्या वतीने लगेचच काढले. यामध्ये नांदेड, लातूर, अंबेजोगाई, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांतून सदरील प्राध्यापकांना प्रतिनियुक्तीवर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू होण्याबाबतचे आदेश काढले आहेत. त्याचबरोबर सदरील प्राध्यापकांना संबंधित महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी तातडीने कार्यमुक्त करावे, असेही आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी म्हटले आहे.

मनुष्यबळाचा प्रश्‍न मार्गी

जून २०२३ पासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू व्हावेत, यासाठी खा. संजय जाधव यांनी तातडीने केलेल्या प्रयत्नांमुळे प्राध्यापकांच्या मनुष्यबळाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. परिणामी,

येत्या वर्षापासून येथील मेडीकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार हे निश्‍चीत झाले आहे. अन्य पायाभूत सुविधा व उर्वरित मनुष्यबळासाठीही केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून सुविधा उपलब्ध करून घेतल्या जातील, असा विश्‍वासही खा. जाधव यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT