Crime News sakal
मराठवाडा

परभणी : स्वतःसह पाच महिण्याच्या मुलिला पाजले विष

रवळगाव येथिल घटना; उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

विलास शिंदे - सकाळ वृत्तसेवा

सेलू : रवळगाव (ता.सेलू) येथे एका ३० वर्षीय विवाहितेने स्वतःसह आपल्या पाच महिन्याच्या मुलीला विष पाजल्याची घटना गुरुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. यामध्ये ५ महिन्याच्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. या दोन्ही मायलेकींना सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर रात्री आठच्या सुमारास पुढील उपचारार्थ परभणी येथे शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या बाबतची माहिती याप्रमाणे, तालुक्यातील रवळगाव येथील रहिवासी असलेल्या ज्योती दत्तात्रय फुलपगार (वय ३०) यांनी विषारी औषध प्राशन केले. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने आपल्या पाच महिन्याच्या मुलीला देखील विष पाजले. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मातेसह मुलीला सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळच्या सुमारास दाखल करण्यात आले.

या दोघींना ही पुढील उपचारार्थ रात्री आठ वाजता परभणी येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आल्याची माहिती उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान पाच महिन्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. आईने स्वत: विष प्राशन करुन मुलीस नेमक्या कोणत्या कारणावरून विष पाजले हे मात्र समजू शकले नाही. या घटनेची सेलू पोलिस ठाण्यात नोंद नसल्याची माहिती पोलिस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी 'सकाळ' शी बोलतांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT