file photo 
मराठवाडा

परभणी महापालिकेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

परभणी :  महापालिकेने मालमत्ताकर, पाणीकराचा भरणा करण्याची मुदत ३१ मे पर्यंत वाढवली असून त्यामुळे करभरणा  करण्यासाठी धडपड करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर महापालिकेने नव्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी देण्यास सुरुवात केली असून त्यामुळे पंधरा ते वीस दिवसावर मिळणारे पाणी आठ ते दहा दिवसात मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हा प्रशासन व महापालिका यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत काही सदस्यांनी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाय योजना राबवताना नागरिकांना होणाऱ्या अडचणींची दखल घेऊन मालमत्ता कराचा भरणा करण्याची तारीख वाढवावी, अशी मागणी केली होती. तसेच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नव्या योजनेतून जुन्यातील कुटुंबांना पाणी द्यावे, अशी सूचनादेखील केली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी सोमवारी (ता.३०) याबद्दलचे निर्देश दिले आहेत. आता ३१ मे पर्यंत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना मालमत्ता कराच्या विलंब शास्तीत ५० टक्के तर पाणी करायच्या विलंब शास्तीत १०० टक्के सूट मिळणार आहे. यापूर्वी ३१ मार्च ही तारीख प्रशासनाने दिली होती. पण, त्यामध्ये आता दोन महिन्यांची वाढ झाल्यामुळे धडपड करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


जुने जलकुंभ भरण्यास सुरवात
महापालिकेची नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झालेली आहे. शहरातील जलकुंभ व वितरण व्यवस्था यांच्या चाचण्यादेखील झालेले आहेत. परंतु, त्यावर नळजोडण्या होत नसल्यामुळे नागरिकांना पाणी देता येत नाही. परंतु जुन्या वितरण व्यवस्थेवर पाणी देताना प्रशासनाची नाकीनऊ येत आहे. विविध कारणांनी पाणी देण्यास पंधरा ते वीस दिवसांचा विलंब होत आहे. त्यामुळे किमान नवीन पाणीपुरवठा योजना, वितरण व्यवस्था कार्यान्वित करून जुन्या जलकुंभांना पाणीपुरवठा केल्यास १५ से २० दिवसानंतर मिळणारे पाणी आठ ते दहा दिवसात येऊ शकते, अशी अनेकांची धारणा झाली होती. जिल्हा प्रशासनानेदेखील त्याची दखल घेतली होती व असे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने शहरातील जुने जलकुंभ नव्या जलशुद्धीकरण केंद्रातून भरण्यास सुरुवात केली असून पाणीवाटप देखील सुरू झाले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT