file photo 
मराठवाडा

परभणी : सेलूत शुध्द पाण्याच्या नावाखाली तेजीत गोरखधंदा.अनेकांकडे परवानगीच नाही

विलास शिंदे

सेलू (जिल्हा परभणी) : अन्न आणि औषधी प्रशासनाची परवानगी, सेंट्रल ग्राऊंड वाॅटर अॅथॅरिटीचे प्रमाणपञ, नगर पालिकेची परवानगी, महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळ आदी विविध विभागाच्या परवानग्या नसतांनाही बिनधास्त पाणी विक्रीचा गोरखधंदा शहर व ग्रामीण भागात तेजीत होत आहे. 

येथिल नगर पालिका हद्दीतील आरो प्लँट, सील बंद पाणी विक्री उद्योगांना  राष्ट्रीय हरित लवाद,  नगर पालिका प्रशासन संचालनालय विभाग, प्रदुषण नियमंक मंडळ यांच्या आदेशानुसार शहरातील १७ आरो प्लँट धारकांना नोटीसा बजावल्या आहेत. १७ पैकी केवळ ३ प्लँट धारकांनीच नोटीसीनंतर कागदपत्रे नगर पालिकेत सादर केले आहेत. शुध्द पाणी विक्री करण्यासाठी शहरात अनेकांनी आरो प्लँट उभारले. मात्र आवश्यक असलेल्या विविध विभागाच्या परवान्या अनेकांकडे नसतांनाही शुध्द पाण्याच्या नावावर पाण्याचा गोरख धंदा सुरू आहे. अनेक आरो प्लँट धारकांकडे शुध्द पाणी करण्यासाठी लागणार्‍या  अद्यावत मशीन देखील नाहीत. तसेच शुध्द पाणी करण्यासाठी लागणारे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे दिसून येत आहे. शहरात शुध्द पाण्याच्या नावावर दररोज हजारो लिटर पाणी जार व्दारे घरोघरी जाऊन पाणी विक्री केली जाते. नळाच्या पाण्यापासून होणार्‍या आजाराची लागण होऊ नये म्हणून हजारो नागरिकांनी महिनेवारी जार लावले आहेत. माञ हे पाणी किती टक्के शुध्द आहे. हे सांगणे कठीण आहे. अनेक प्लँट धारक वाहनात एक हजार लिटरच्या प्लॅस्टीक टाकीत पाणी भरतात. त्यानंतर घरासमोर आल्यानंतर रिकाम्या जार मध्ये या टाकीतील पाणी भरून जार देतात. त्यामुळे पाण्याच्या शुध्दतेकडे दुर्लक्ष केले होत आहे. 

शहरात गल्ली- बोळात आरो प्लँट टाकून पाण्याचा धंदा केला जात आहे. कसलीही परवानगी न घेता शुध्द पाणी म्हणून विकले जात आहे. या पाण्याची गुणवत्ता कोणाकडूनही तपासली जात नाही. टीडीएस किती,  मिनरलचे प्रमाण या संदर्भात कोणतीही शास्ञीय तपासणी होत नाही. अनेक प्लँट धारकांकडे पाणी तपासणीच्या शहरात लॅबची व्यवस्थाच नाही. 

पालिका करणार कारवाई...

नगर पालिकेच्या वतीने शहरातील आरो प्लँट संदर्भात सर्व्हेक्षण करण्यात आले. शहरातील १७ आरो प्लँट धारकांना कागदपत्रे सादर करण्याची सूचना दिली आहे. माञ अद्यापपर्यंत तीन आरो प्लँट धारकांनी कागदपत्रे सादर केली आहेत. कागदपत्राची पडताळणी करून ज्यांच्याकडे परवानगी नाही. अशा आरो प्लँट धारकांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. 

— अक्षय पल्लेवाड, उप मुख्याधिकारी नगर पालिका, सेलू 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT