file photo 
मराठवाडा

परभणी : वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या; नरसापूर येथील घटना, काय आहे कारण वाचा...

दिलीप मोरे

देवगावफाटा ( जिल्हा परभणी ) : सेलू तालुक्यातील नरसापूर येथील एका वृध्दाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी ( ता. १४ ) सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शेषराव शंकरराव गडदे ( वय ६० ) असे आत्महत्या केलेल्या वृध्दांचे नाव आहे.

शेषराव गडदे यांना एक मुलगा आहे परंतु त्यांचा मुलगा मुंबई येथे राहत असल्यामुळे शेषराव गडदे हे नरसापूर येथे एकटेच राहत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री शेषराव गडदे हे आपल्या राहत्या घरात झोपले होते. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी आजूबाजूचे शेजारी उठल्या नंतरही ते उठले नसल्याने शेजाऱ्यांनी खोलीच्या दरवाज्याजवळ जात आवाज देऊन दरवाजा ठोठावला मात्र, आतून कोणताही प्रतिसाद येत नसल्यामुळे शेजाऱ्यांनी खोलीला असलेल्या खिडकीतून डोकावून पाहिले तर, शेषराव गडदे हे घराच्या पत्राखाली असलेल्या आडूला दोरीच्या साह्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आले. 

चारठाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्या भावाला सांगून भावाने या घटनेची माहिती चारठाणा पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर चारठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप अल्लापूरकर, बीट हवालदार गुलाब भिसे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला व प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह हा सेलू येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. याप्रकरणी चारठाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT