file photo 
मराठवाडा

परभणी : झरी परिसरात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

अनिल जोशी

झरी (जिल्हा परभणी) : बोंडअळी्च्या संकटानंतर यंदा पुन्हा कपाशीवर लाल्या ( दहिया ) रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. झरी (ता. परभणी) शिवारात या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्याण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने याबाबत उपाययोजना सुचविल्या आहेत.

दरवर्षी कपाशीवर नवनवे संकट येत आहे. कधी बोंडअशी तर कधी अतिवृष्टीमुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. गतवर्षीपासून लाल्या रोगाने थैमान घातले आहे. गत हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कपाशी पीक हातातून गेले होते. यंदा देखील पाऊस उशीरापर्यंत सुरु राहील्याने सोयाबीन उत्पादक संकटात आहेत. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी कपाशीवर नवे संकट उभे राहीले आहे. सध्या कपीशीची एक वेचणी झाली असून एकाच वेचणीत कपाशीचा पाला झाल्याने झालेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे. यंदा कपाशीला लाल्या रोगाने ग्रासले आहे. गेल्या आठवड्यापासून सततच्या पावसामुळे कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्याने दुबार पेरणी करूनही बी- बियाणे फवारण्या करूनही कापसाचे क्षेत्र वाढवले, परंतु लाल्याचा प्रादुर्भाव घेतल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. महागडी खते व बी बियाणे आणून खुरपण, वखरणी करून पाच ते सहा फवारण्या झाल्या, शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आता कापसावर होती. परंतु परिसरात लाल्याचा प्रादुर्भाव कापसावर पडल्यामुळे कापूस एका वेचणीतच संपला असे चित्र झरी परिसरात निर्माण झाले आहे.

 कृषि विद्यापीठाने सुचविल्या उपाययोजना

सध्या मराठवाड्यात कपाशीवर पडलेल्या लाल्या रोगावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने उपाययोजना सुचविल्या आहेत. कापूस पिकात दहीया रोगाच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी अॅझोक्सिस्‍ट्रॉबीन + डायफेनोकोनॅझोल १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून पावसाने उघाड दिल्‍यास फवारणी करावी. तसेच कापूस पिकात आंतरिक बोंड सड याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड २५ ग्रॅम + स्‍ट्रेप्‍टोसायक्‍लीन २ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून पावसाने उघाड दिल्‍यास फवारणी करावी. सध्‍याच्‍या कोरडया हवामानामूळे कापूस पिकात रसशोषन करणा-या किडींचा (मावा, तुडतूडे, फुलकिड) प्रादुर्भाव दिसून ये असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी निंबोळी अर्क ५ किंवा फिप्रोनील ५ टक्के ६०० मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ ट्के१६० मिली किंवा बुप्रोफेंझीन २५ टक्के  ४०० मिली प्रती एकर पावसाने उघाड दिल्‍यास फवारणी करावी.

खर्चही निघाला नाही

मी दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठा खर्च करुन कपाशीच्या   चार बॅग लागवड केली आहे.खत,फवारणी,कोळपणी यावर मोठा खर्च झाला आहे.परंतु  गेल्या आठ दिवसापासून कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे होत्याचे नव्हते झाले.एका वेचणीत कापुस संपल्याचे चित्र असून झालेला खर्चही निघाला नाही.

- अनिल वटारे, शेतकरी, झरी.ता परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT