Parbhani farmer news esakal
मराठवाडा

Parbhani : सोयाबीन पिकाचा दिवाळीपूर्वी द्या अग्रीम पीकविमा

गंगाखेड येथे विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

गंगाखेड : नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचा दिवाळीपूर्वी अग्रीम पीकविमा द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी मागण्यासाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने सोमवारी (ता. १०) रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

सततचा पाऊस व नंतर पडलेल्या खंड यामुळे पिकाची परिस्थिती गंभीर आहे. यामुळे डोंगरी जन परिषदेच्या वतीने शहरातील पालम रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांचा २५ टक्के अग्रीम विमा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.

अतिवृष्टी अनुदानात संपूर्ण तालुक्याच्या समावेश करावा, कार्यालय बसून बनावट पंचनामे करीत निरंक अहवाल सादर करणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीवर गुन्हा दाखल करावा आदी मागण्या करण्यात आल्या.यावेळी डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक पंडित घरजाळे, आश्रोबा सोडगीर, पंडित सोडगीर, बालासाहेब मुंडे, बंकट मुंडे, जगन्नाथ मुंडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link: मिसिंग लिंक मार्गावर पुणे–मुंबई वाहतूक बंद; मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग सुरळीत

Kolwan Rain : जोरदार पावसामुळे कोळवण खोऱ्यातील जनजीवन विस्कळित; वळकी नदीचे रौद्र रूपामुळे अंतर्गत पुलांवरुन पाणी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी

Latest Marathi News Update: दिवसभरातील पावसाचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Khadaki Rain : खडकी भागात मुसळधार पाऊस; गुरुद्वारा आणि टीकाराम महाविद्यालय परिसरात पाणीच पाणी

Computer Typing Examination : नाशिक जिल्ह्यातील संगणक टंकलेखन परीक्षा स्थगित; मालेगाव केंद्रावरील परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसार..

SCROLL FOR NEXT