file photo 
मराठवाडा

परभणी : कोरोना संकटात शेतकऱ्याला लाल मिरचीची साथ

दिलीप मोरे

देवगावफाटा (जिल्हा परभणी) : कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असताना शेतीही त्याला अपवाद कशी ठरणार. शेतमालाचे त्यात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला. अशातच देवगावफाटा (ता. सेलू) येथील एका शेतकऱ्यानी मिरची शेतातच पिकू देऊन पंधरा गुंठ्यात एक लाखाचे लाल मिरचीचे उत्पन्न घेतले. त्यामुळे कोरोना संकटात या शेतकऱ्याला लाल मिरचीने चांगलीच साथ दिल्याचे दिसत आहे.

गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे शेतकरी अगोदरच हतबल झाला असून यावर्षीही तसेच कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यात भाजीपाला बाहेर जाणे थांबविण्यात येत असल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव गडगडले. नाईलाजाने शेतकऱ्यांना दोन ते तीन रुपये किलो भावाने भाजीपाला विकण्याची वेळ आली. परंतु देवगावफाटा येथील शेतकरी संतोष गरड यांनी आपल्या शेतामध्ये भाजीपालासह पारंपरिक पिकासोबत घरीच तयार केलेल्या दोन हजार मिरची रोपट्यांची आपल्या पंधरा गुंठ्यात लागवड केली. त्यानंतर दोन झाडांमध्ये योग्य अंतर ठेवून योग्य मशागत केल्याने मिरची चांगलीच बहरली. सुरवातीला हिरव्या झाडांना चांगला फुलोरा आल्यामुळे मिरच्याही चांगल्या लागल्या. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी हिरव्या मिरच्याची तोडणी न करता झाडालाच लाल मिरच्या झाल्यावर मिरच्याची तोडणी केली. या लाल मिरचीचे दर सध्या १५० ते १६० रुपये प्रति किलो आहेत. या दराचा विचार केल्यास संतोष गरड यांना पंधरा गुंठ्यामध्ये एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य व काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे. तसे केल्यास अनेक पिके कमी दिवसात घेऊन प्रत्येक शेतकरी आपली आर्थिक उन्नती साधु शकतात.
- संतोष गरड, शेतकरी, देवगावफाटा, ता. सेलू.

संपादन- प्रल्हाद कांबळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT