Parbhani science complex set up sakal
मराठवाडा

परभणीत अद्यावत 'विज्ञान संकुल' उभारले जाणार

विज्ञान संकुलाची वास्तु ठरणार वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरातील पाच एकर जागेवर अद्यावत असे विज्ञान संकुल उभारले जाणार असून ही वास्तू वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना ठरणार असल्याचे संकल्पचित्रावरुन दिसून येत आहे.

जगात अनेक इमारती, वास्तु त्यांच्या वास्तुशास्त्र, वास्तुकलेमुळेच आजही प्रसिध्द आहेत. येथील विज्ञान संकुलाची इमारत देखील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना ठरण्याची शक्यता आहे. विज्ञान संकुल म्हटले की ती वास्तु देखील वैज्ञानिक दृष्टीकोणाला साजेशी असणे अपेक्षीत असते. अगदी त्याच पध्दतीचा आराखडा या संकुलासाठी तयार करण्यात आलेला असून इमारत विज्ञानप्रेमींसह सर्वसामान्यांचे आकर्षण ठरणार आहे. पाच एकर जागेत वर्तुळाकार इमारतीला वर्तुळाकार रस्ता व बाहेर पडण्यासाठी तीन बाजुंनी रस्ते राहणार आहेत तर छतावरील डोम देखील विज्ञानाशी साधर्म्य साधणारा ठरणार आहे.

विज्ञान संकुलाचा उद्देश

विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत विज्ञानाची आवड रुजविणे, खगोलशास्त्र व त्याच्याशी निगडीत शास्त्रांची माहिती देणे व प्रसार करणे, समाजाचा स्वभाव विज्ञानवादी बनविणे, विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध शाखांची माहिती देणे, मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे, वैज्ञानिक विचारवंत निर्माण करणे व त्यातून प्रगती साधणे ही या प्रकल्पाची उद्दीष्ट्ये आहेत.

प्रस्तावित प्रकल्प

विज्ञान संकुलात अनेक बाबी प्रस्तावित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आदी विषयात तयार करण्यात आलेल्या वैज्ञानीक प्रकल्पांची माहिती देणे, परभणी येथील रहिवासी, पर्यटक, खगोलप्रेमी व शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक व शैक्षणिक अनुभव वाढीसाठी अद्याधुनिक तारांगण प्रकल्प कार्यान्वित करणे, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण होऊन त्यांना आवडणाऱ्या विषयात करिअर करण्यासाठी मार्गदर्शन करणे आदी बाबींचा समावेश केला जाणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसयाटीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दुपारी तीन वाजता विज्ञान संकुल इमारतीचे भूमिपुजन राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनजंय मुंढे, कृषीमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, माजी कुलगुरु डॉ. अशोक ढवण, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागरृहात होणार आहे.

विज्ञान संकुलाची व्याप्ती

या इमारतीत विविध सोयीसुविधांसाठी स्वतंत्र दालणे राहणार आहेत. तारांगण, ऑडिटोरीएम, बेसिक सायन्स, वाव सायन्स, अप्लाईड सायन्स, टेलीस्कोप आणि सायन्स गॅलरी, पुस्तकांचे दालन, प्रतिक्षागृह, तिकीट खिडकी, उपहारगृह, स्वच्छतागृहे आदी बाबींचा त्या मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT