file photo 
मराठवाडा

परभणी : महापालिकेची सहा रुग्णालये नॉन कोविड रुग्णासाठी परत सुरु

गणेश पांडे

परभणी : महानगरपालिकेने शहरातील आपली सर्वच्या सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्र नाँन कोविड रुग्णांसाठी सुरू केली आहेत. त्याचबरोबर रँपिड अँटीजन टेस्टच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्यांवर भर दिला आहे.

महानगरपालिकेचे वाढत्या कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासह एकूण १६ ठिकाणी रॅपिड अँन्टीजन टेस्ट केंद्रे सुरू केली होती. त्यामुळे  नाँनकोविड रुग्णांच्या तपासण्या बंद झाल्या होत्या. सर्वसामान्य रुग्णांची मात्र पंचाईत झाली होती. खाजगी रुग्णालयात शिवाय पर्याय राहिला नव्हता. तसेच त्यांच्याकडे शंकेच्या नजरेने पाहिले जात होते. परंतु गेल्या महिनाभरापासून चाचण्यांची संख्येबरोबर रूग्णांची संख्या देखील घटली. त्यामुळे आता कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने घट होऊ लागली असून पालिकेने शहरात 16 ठिकाणी सुरू केलेली रॅपिड एंटीजन टेस्ट केंद्र पालिकेने सुरु केलेली अपवाद वगळता रँपिड टेस्ट केंद्रे  टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत. तर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी देखील सुरु केल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात एक स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला असून तेथे कोरोना संशयित रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.

महापालिकेचा आरटीपीसीआर चाचण्यांवर भर

शहरासह जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांच्या तुलनेत रॅपिड टेस्ट या चाचण्यांची संख्या लक्षणीय होती. त्यामधून मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. रँपिड टेस्ट बद्दल नागरिकांमध्ये देखील संभ्रमावस्था होती. अनेकांनी या चाचण्यांत बद्दल शंका व्यक्त केली होती. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे परभणी जिल्ह्या दौऱ्यावर आले असता त्यांनी रॅपिड टेस्टची संख्या पाहून आश्चर्य व्यक्त केले होते. या चाचण्या मोठ्या प्रमाणात का घेतल्या गेल्या असा सवालही उपस्थित केला होता. त्यामुळे आता महानगरपालिकेने रॅपिड टेस्ट गरज असल्यासच घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते तर आरटीपीसीआर चाचण्यांवर भर दिला आहे. आता सिटी क्लबसह मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बहुतांश करून आर्टिफिशियल चाचण्या घेतल्या जात आहेत. रॅपीड टेस्टबद्दल नागरिकांमध्ये देखील संभ्रमावस्था होती. अनेकांनी या चाचण्यांत बद्दल शंका व्यक्त केली होती.

आता मनपाच्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसामान्य रूग्णांसाठी खुली केली आहेत तेथे फक्त एका कक्षातच rt-pcr चाचणी घेतली जाते तर उर्वरितठि काणी शासनाच्या माझे कुटुंब माझीजबाबदारी या सह गरोदर माता, लहान बालक यांच्यासाठी लसीकरणाची सुद्धा सुविधा सुरू झालेली आहे

- डॉ. कल्पना सावंंत, आरोग्य अधिकारी, मनपा, परभणी.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT