file photo 
मराठवाडा

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक

गणेश पांडे

परभणी : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर बुधवारी (ता. २६) अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिल्या नंतर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या राजीनाम्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी खासदार यांचा राजीनामा देणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. त्यातच रात्री 10 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर मोटरसायकलवरून आलेल्या तीन युवकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या दगड फेकीत कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. घटनेनंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

 या राजीनामा नाटयानंतर खासदार संजय जाधव याना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खासदार जाधव यांना मुंबई येथे बोलावून घेतले आहे.

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्यासह अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसकडून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खंत खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमुद केली होती. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी वारंवार हस्तक्षेप करत आहेत. त्यांची दादागिरी वाढत जात असल्याचेही या पत्रात खासदारांनी नमुद केले.  जिल्ह्यासह राज्यातील काही धोरणात्मक निर्णयातील एकतर्फी हस्तक्षेपाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. दरम्यान, खासदार संजय जाधव यांच्या या नाराजीमुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील बेबनाव स्पष्टपणे सर्वसामान्यासमोर आला आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुंदपोसुंदी सुरुच आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT