Parbhani Weather Update esakal
मराठवाडा

Parbhani : परभणीत थंडीचा कडाका वाढला, तापमान ७.६ अंश सेल्सिअसची नोंद

परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

गणेश पांडे

परभणी : मागील काही दिवसांपासून परभणीच्या तापमानाचा पारा घसरत असून, त्यानुसार मंगळवारी (ता.२१) ७.६ अंश सेल्सिअस इतके नीच्चांकी तापमान नोंदविण्यात आले आहे. यामुळे परभणीकरांना (Parbhani) बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या चार दिवसांत जिल्ह्यासह मराठवाड्याचे (Marathwada) तापमान घटल्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने (Weather) वर्तवली आहे. परभणी जिल्ह्यात नोव्हेंबरलाच थंडी दाखल झाली होती. मात्र, यंदा ऐन दिवाळीत तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील गारवा नाहीसा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तापमानात घट होत आहे. (Parbhani Weather Updates Extreme Cold Hikes)

गेल्या काही दिवसांपासून परभणीचे किमान तापमान १० अंशाच्या खाली आले आहे. त्यात आज मंगळवारी तर ७.६ अंश एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागात झाली आहे. या वर्षातील हे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान असूून, यापुढे त्यात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर भारतात निर्माण झालेली थंडीची लाट यावर्षीच्या थंडीला कारणीभूत आहे. त्याप्रमाणेच यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. ज्यामुळे जिल्ह्याची पाणी पातळी देखील वाढली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT