file photo
file photo 
मराठवाडा

परभणीचा पारा 8.8 अंश सेल्सिअसवर, शेकोट्या पेटल्या

गणेश पांडे

परभणी ः शहरासह संपूर्ण जिल्ह्यात तापमानाचा पारा कमालीचा खाली उतरत आहे. सोमवारी (ता.नऊ) सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागाने घेतलेल्या नोंदीत परभणीचे तापमान 8.8 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. या वर्षातील हे आता पर्यंतचे सर्वात कमी तापमान असल्याचे विद्यापीठाच्या सुत्रांनी सांगितले.

परभणी शहराचे तापमान गेल्या काही वर्षापासून कमालीचे खाली उतरत आहे. हिवाळ्यात शहराचे तापमानाचा पारा 4 अंशाच्या खाली उरलेलेले उदाहरण आहे. यंदा देखील तापमानाचा पारा अजून खाली जाण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस जोरदार झाला होता. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला होता. त्यामुळे जिल्ह्याची पाणी पातळी देखील वाढली आहे. यामुळे जिल्हयात यंदा थंडी वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्या प्रमाणे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा खाली उतरत आहे.  या आधी परभणीचे तापमान रविवारी (ता.आठ) 11 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते. त्यानंतर आता हा पारा सोमवारी अधिकच खाली आला. दोन अंशाने हा पारा खाली घसरत तो 8.8 अंश सेल्सिअस वर आला आहे अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

स्वेटरची दुकाने सजली

तापमानाचा पारा रविवार पासून खाली उतरत असल्याने शहरातील स्टेशनरोड परिसरात स्वेटर विक्रेत्यांनी त्यांची दुकाने सजवली आहेत. परंतू हिमाचल प्रदेशातून व्यापारी मात्र दाखल झाले असले तरी अद्याप त्यांनी त्यांची दुकाने थाटलेली नाहीत. सध्या स्टेशनरोडवरील स्वेटरच्या दुकानावर स्वेटर खरेदीसाठी गर्दी होतांना दिसत आहे.

मॉर्निग वॉकसाठी गर्दी वाढली

दोन दिवसापासून थंडी वाढत असल्याने सकाळी फिरण्यास जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचे रविवारी व परत सोमवारी दिसून आले. शहरातील कृषी विद्यापीठ परिसर, पोलिस ग्रॉऊंड व इतर ठिकाणी फिरण्यास जाणाऱ्यांची संख्या दुपट्टीने वाढली असल्याचे दिसत आहे.

तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता

परभणी शहराचे तापमान आणखी खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान तापमानाचा पारा 4 पर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे असी माहिती विद्यापीठातील सुत्रांनी वर्तविली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT