Parbhani News esakal
मराठवाडा

ध्येयवेड्या तरुणाने बुलेटवर केले चारधाम,९ हजार किमी प्रवास पूर्ण

आता स्वत:चा व्यवसाय सांभाळत आजपर्यंत तब्बल सहा वेळा संपर्ण देश पादाक्रांत केला आहे.

​गणेश पांडे

परभणी : सामाजिक दातृत्वाची मनात जाणीव धरून परभणीतील एका ध्येयवेड्या तरूणाने चक्क चारधाम (Chardham) व चारपीठाचा 9 हजार 903 किलोमीटरचा प्रवास नुकताच पुर्ण केला आहे. शैलश कुलकर्णी असे या तरूणाचे नाव आहे. कोरोना संसर्गानंतर प्रतिबंधक लसीकरण अभियानाच्या जनाजागृतीसाठी शैलेशने हा धाडसी प्रवास चक्क स्वत:च्या बुलेटवरून पूर्ण केला आहे. शैलेश कुलकर्णीच्या या धाडसाचे परभणीत कौतुक होत आहे. परभणी शहरातील येथील येलदरकर कॉलनीमध्ये राहणाऱ्या शैलेश या ध्येयवेड्या तरूणाने आजपर्यंत प्रवासाचे अनेक विक्रम पूर्ण केले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या एस.एम.कुलकर्णी यांचा लहान मुलगा शैलेश कुलकर्णी हा बालपणापासूनच वडीलांच्या कठोर शिस्तीत वाढला. रक्तातच (Parbhani) शौर्य व पराक्रम असलेल्या घरात लहानाचा मोठा झाला. आता स्वत:चा व्यवसाय सांभाळत आजपर्यंत तब्बल सहा वेळा संपर्ण देश पादाक्रांत केला आहे.

प्रत्येक वेळी सामाजिक बांधिलकी बाळगत वेगवेगळ्या जनजागृतीसाठी त्यांने भ्रमंती मोहिम फत्ते केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. याच अभियाना संदर्भात जनजागृती करण्याचा निर्धार शैलेश कुलकर्णी यांनी केला. त्यासाठी चार धाम व आद्य शंकराचार्यांनी स्थापित केलेले चार पीठांची निवड केली. 9 ऑक्टोबर रोजी आपल्या बुलेटवर ही मोहिम सुरु केली. या प्रवासामध्ये दररोज 600 ते 700 किलोमिटर प्रवासात गायत्रीपीठ (द्वारका), ज्योतीमठ (बद्रीनाथ), गोवर्धन पीठ (जगन्नाथपुरी), श्रृंगेरीपीठ (कर्नाटक) यासह द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी व रामेश्वरम या चारधामचा प्रवास पूर्ण केला. शैलेश कुलकर्णीच्या या धाडसाला त्यांची पत्नी अपर्णा कुलकर्णी, वडील एस.एम.कुलकर्णी, आई रेखा कुलकर्णी, सासरे किशोर जोशी, सासू साधना जोशी यांचे पुर्ण पाठबळ राहिले.

या मोहिमा केल्या पूर्ण

- भारतीय सेना सन्मान यात्रा (2017) ही काश्मिर ते कन्याकुमारी,

- परभणी - लौंगीवाला - रन ऑफ कच्छ (2018),

- भारत - नेपाळ - भुटान या तीन देशात से नो टु सिंगल युज प्लास्टिक (2019),

- नर्मदा परिक्रमा (फेब्रुवारी 2020) या परिक्रमेची नोंद गिनिज बुकात झाली.

- दत्त परिक्रमा (डिसेंबर 2020)

विविध सामाजिक संदेश व जनजागृती अभियानासाठी लाखो रुपयांच्या स्वखर्चाने मी मोहिमा राबवितो. मात्र या संदर्भात परभणीतूनच पाठिंबा मिळत नाही ही खंत वाटते. भविष्यात जर योग्य पाठबळ मिळाले तर आणखी मोठ्या मोहिमा पार पाडण्याचे स्वप्न बाळगून आहे.

- शैलेश कुलकर्णी, अभियंता, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT