file photo 
मराठवाडा

पालकांनो, मुलांकडे द्या लक्ष...

अभय कुळकजाईकर

नांदेड - विभक्त कुटुंब पद्धतीबरोबरच आई - वडील दोघेही नोकरीला असल्यामुळे त्याचा मुलांवर परिणाम होताना दिसत आहे. तसेच मोबाईलच्या वाढत्या प्रमाणाचे देखील बरे - वाईट परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे काही अप्रिय घटनाही घडत असून त्या बाबतीत पालकांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचबरोबर जनजागृतीसाठी संस्था, संघटनांनीदेखील पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे समाजात दिवसेंदिवस वेगाने बदल घडत आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीत वाढ झाली आहे. तसेच आई आणि वडील दोघेही नोकरीला असण्याचे प्रमाण शहरात वाढत चालले आहे. त्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरात मोठी माणसे नाहीत. त्यातच मुलांमधील मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्याचे बरे - वाईट परिणाम दिसू लागले आहेत. त्यातच अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सजग आणि सावध राहणे गरजेचे
पालकांनी मुलांबाबत सजग आणि सावध राहणे गरजेचे आहे. आपली मुले दिवसभर काय करतात याकडे त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर मुलांसाठी पालकांना वेळही द्यावा लागणार आहे. जेणेकरून या मुलांचे भवितव्य सुरक्षित होईल. काही ठिकाणी शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे, विशेष करून मुलींचे प्रबोधन होण्यासाठी तसेच त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचारासंदर्भात दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुली, तरुणी व महिलांबाबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संघटनांनीही पुढाकार घेऊन जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पोलिस विभागाच्या वतीने या बाबत शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृतीही करण्यात आली आहे.

विविध घटकांवर होतोय परिणाम
मुलांच्या शारीरिक, भाषिक, बौद्धिक व मानसिक वाढीवर परिणाम होत असून
पालकांनी मुलांबाबत सजगता बाळगण्याची गरज निर्माण झाल्याचे मत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अमोल निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. विशेषतः मुलांच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये मुलांबाबत अतिकाळजी, इलेक्ट्रानिक गॅझेट व योग्य सामाजिक वातावरण न मिळणे आदी कारणांमुळे मुलांच्या शारीरिक, भाषिक, बौद्धिक व मानसिक वाढीवर परिणाम होताना दिसून येत आहे. परिणामी भाषिक विकासामध्ये मुले उशिरा बोलणे, अडखळत बोलणे, पुन्हा पुन्हा तेच वाक्य बोलणे, एकलकोंडेपणा, कमी सहकार्य वृत्ती दिसून येत आहे. शारीरिक विकासात हलनचलनाविषयी अडचणी, थकवा, सुक्ष्मकारक कौशल्यांमध्ये अडथळे (उदा. पेन, पेन्सिल पकडण्यात अडचण) तर बौद्धिक विकासमध्ये बुद्धीगुणांक कमी असणे, समस्या निराकरणास अडचणी, योग्य निर्णय क्षमता नसणे यासारख्या समस्या निर्माण होत आहेत.

पालकांनी वेळीच लक्ष द्यावे
मुलांच्या विविध वैकासिक टप्प्यांमध्ये आलेल्या अडचणींमुळे पुढे मुले अयोग्य वर्तन, चिडचिडेपणा, हट्टीपणा, अतिचंचलता, अभ्यासातील अडचणी, व्यसनाधिनता अशा समस्यांना सामोरे जाताना दिसून येत आहेत. अशा वेळी पालकांनी वेळीच या बाबत संबंधित सल्लागारांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
- अमोल निंबाळकर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुणे-मार्केट परिसरात तणाव; मंडळांमध्ये जोरदार भांडण

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT