मराठवाडा

पालकमंञ्यांनी घेतली पिडीत मुलीची भेट

नवनाथ येवले

नांदेड : शंकरनगर (ता. बिलोली) येथील अत्याचार पीडित मुलीवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील पीडित मुलीस सोमवारी (ता. २०) पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात जावून धीर दिला. अत्याचार पीडित मुलीस तातडीच्या उपचारासह आवश्यक मदतीच्या सूचना देत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले.

विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शंकरनगर येथील अत्याचार पीडित मुलीची पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी रात्री आस्थेवाईकपणे चौकशी केली. पीडित मुलीचे मनोधैर्य वाढवत पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी रुग्णालय प्रशासनास उपचारात दिरंगाई खपवून घेणार नसल्याची तंबी दिली. पोलिस प्रशासनास आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश देत सामज कल्याण विभागास तातडीने मदतीच्या सूचनाही त्यांनी दिल्या.यावेळी पीडित मुलीस  ‘ संकटाचा धैर्याने सामना कर, मी तुझ्या पाठीशी आहे’ असे म्हणून धीर दिला. या वेळी आमदार मोहन हंबर्डे, रावसाहेब अंतापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, पीडित मुलीचे कुटुंबीय, प्रा. रामचंद्र भरांडे, श्याम कांबळे, राहुल जिगळेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पिडितेला तातडीची मदत
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. २१) समाजकल्याण विभागाकडून पिडीत मुलीच्या कुटूंबीयांना तातडीने चार लाख बारा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. 

त्या नराधम शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
अत्याचार प्रकरणी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयातील आरोपी शिक्षकांवर निलंबन कारवाईच्या पुर्वपरवानगीचे सोमवारी (ता.२०) संस्थेस जारी केले. त्यानुसार संस्थेकडून तातडीने चारही शिक्षकांवर निलंबन कारवाईचा प्रस्ताव संस्थेने शिक्षणविभागाकडे पाठवला आहे. 

बिलोलीत बंद, रास्ता रोको
शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २२) बिलोली येथील तहसील कार्यालयासमोर रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्वपक्षीय बिलोली शहर बंदची हाक देण्यात आली असून आरोपींना तात्काळ अटकेच्या मागणीसाठी मातंग समाजच्या वतिने रास्तारोको आंदोलन करण्यता येणार आहे समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, मानवी हक्क अभियानाचे जिल्हा अध्यक्ष मारुती वाघमारे, मार्तंड जेठेे, बस्वराज वाघमारे, बाबूराव गंजगावकर, कॉम्रेड गंगाधर आरशे, पंढरी गायकवाड, बाबूराव इंगळे, संभाजी दुगावकर, राजू एडके यांनी केले आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

SCROLL FOR NEXT