Parliament Security breach accused amol shinde parent expressed the desire to contact with son on the phones marathi news  
मराठवाडा

Parliament Security Breach : ...तर आपल्या जीवाचं काहीतरी बरं-वाईट करू; मुलाच्या भेटीसाठी अमोल शिंदेचे आई-वडील कासावीस

संसदेत बुधवारी (१३ डिसेंबर) रोजी घुसखोरी करण्यात आल्याच्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली होती.

रोहित कणसे

संसदेत बुधवारी (१३ डिसेंबर) रोजी घुसखोरी करण्यात आल्याच्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली होती. संसदेत घुसखोरी करणाऱ्यांमध्ये मराठवाड्यातील लातूरचा थरुण अमोल शिंदे हा देखील होता. दरम्यान आता अमोलच्या आई वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुलगा अटकेत असल्याने दोघे चिंतेत असून पोलिसांची चौकशीमुळे त्रस्त झाले आहेत.

पोलिसांच्या चौकशीमुळे त्यांना मजुरीसाठी देखील जाता येत नाहीये, अशा परिस्थितीत त्यांनी अमोलशी संपर्क करुन द्या अन्यथा आम्ही जीवन संपवू इशारा दिला आहे.

संसदेमध्ये घुसखोरी करून गदारोळ करणारा अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील झरी बुद्रुक गावचा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान गेल्या ४ दिवसांपासून आपल्या मुलाशी संपर्क होत नसल्याने, आता अमोल शिंदे यांच्या आई वडिलांची चिंता वाढली आहे. साम टिव्हीने याबद्दल वक्तव्य केलं आहे.

शेवटचा पर्याय म्हणून फोनवर भेट झाली तर ठिक, नाहीतर लातुरच्या कलेक्टर ऑफिसला जाऊ, आपल्या जीवाचं काहीतरी करू. आता जगून तरी काह फायदा असं अमोलचे वडिल म्हणाले. दररोज दारात पोलीस असल्याने कुणी त्यांना मजुरीला देखील बोलवत नाही. त्यामुळे जगायचं कसं? असा प्रश्न देखील त्यांच्यासमोर उभा राहिला आहे, असं अमोल शिंदे याच्या वडिलांनी म्हटलं.

बुधवारी संसद सभागृहाच्या कामकाजादरम्यान सागर शर्मा आणि मनोरंजन डी नावाच्या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली होती. यावेळी त्यांनी सभागृहात धुराच्या कांड्या देखील फोडल्या त्यामुळे लोकसभेत धूर पसरला होता. त्याचवेळी अन्य दोन आरोपी नीलम आणि शिंदे यांनीही संसदेबाहेर घोषणाबाजी करत धुर सोडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT