parshottam rupala parshottam rupala
मराठवाडा

'महाराष्ट्रात बांबू क्रांती घडावी, पाशा पटेल यांनी नेतृत्व करावे'

इंडियन बांबू फोरमच्या वतीने ‘बांबू शेती’ या विषयावर झालेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते

सकाळ वृत्तसेवा

लातूर: गुजरातमध्ये ज्या प्रमाणे दुधाची क्रांती होऊन शेतकरी आर्थिक समृद्ध झाला आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात बांबूमध्ये क्रांती घडून येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा. यासाठी गेली काही वर्ष या क्षेत्रात काम करीत असलेले शेतकरी नेते व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (pasha patel) यांनी पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला (parshottam rupala) यांनी व्यक्त केले.

बुधवारी (ता. पाच) इंडियन बांबू फोरमच्या वतीने ‘बांबू शेती’ या विषयावर झालेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. ‘इनबार’ या संस्थेचे इथिओपिया येथील प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. सलीम रझा, डेहराडून येथील जेनेटिक्स अॅण्ड ट्री इम्प्रूव्हमेंट फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. अजय ठाकूर, सिंधुदुर्ग येथील कॉनबॅक या संस्थेचे निर्देशक संजीव करपे, मुंबई विश्व विद्यालयाचे माजी कुलपती डॉ. संजय देशमुख आणि पाशा पटेल हे सहभागी झाले होते. बांबूला अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न बांबू मिशनच्या माध्यमातून केला जात आहे.

यासाठी कायद्यात बदलही केला आहे. बांबूला कौशल्य विकासासोबत जोडण्याचा प्रयत्न आहे. बांबू लागवडीत आर्थिक फायदा आहे, हे शेतकऱ्यांना पटवून सांगण्याची गरज आहे. गुजरातमध्ये दुधाची क्रांती घडली. अशीच क्रांती महाराष्ट्रात बांबूमध्ये घडावी. याकरिता श्री. पटेल यांनी पुढाकार घ्यावा. केंद्र शासनाने बांबूलाही ॲग्रिकल्चर इन्फास्ट्रक्चर फंड मधून निधी देण्याचे जाहीर केले आहे. या निधीचा त्यांनी वापर करून घ्यावा, असे आवाहन श्री. रुपाला यांनी यावेळी केले. महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त हा बेबीनार घेण्यात आला.

भारत दुसऱ्या स्थानावर-
जगभरात बांबूच्या ७६ प्रजाती व बाराशे उपजाती आहेत. यात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. केवळ कागद उद्योगात १९ लाख टन बांबूचा वापर केला जात आहे. वर्षाला पाच कोटी २० लाख मनुष्य दिन रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता बांबूच्या क्षेत्रात आहे, असे श्री. देशमुख म्हणाले.

एकदा लावल्यानंतर ४० वर्ष पीक-
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बांबूमध्ये पाच लाख कोटीची उलाढाल आहे. भारतात वीस हजार कोटीचा बाजार आहे. कोरडवाहू तसेच नदी काठच्या जमिनीत बांबू चांगला येवू शकतो. एकदा लावल्यानंतर ४० वर्षांपर्यंत ते पीक घेता येते, असे डॉ. ठाकूर म्हणाले. आज बांधकाम क्षेत्रापासून ते ज्यूस करण्यापर्यंत बांबूचा वापर करता येत आहे.

पूर्व आफ्रिकेमध्ये याचे मोठे काम सुरु आहे, असे श्री. रझा म्हणाले. आंबा, काजू असणाऱ्या कोकणात आज बांबू लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. बांबूपासूनच्या वस्तूला मोठी मागणी आहे. बांबूपासून बंगळूरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि चंद्रपूर येथे होत असलेले एक लाख चौरस फुटाचे स्ट्रक्चर हे मॉडेल तयार होत आहेत, असे श्री. करपे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT