ST Bus News Latur  
मराठवाडा

भीतीपोटी प्रवाशांची एसटीकडे पाठ, दोन दिवसांत अल्प प्रतिसाद

सुशांत सांगवे

लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी गेल्या तीन दिवसांत बसला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना फैलावाच्या भीतीमुळे बहुतांश प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवत प्रवास करणे टाळले आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने टाळेबंदी लागू केली. त्यानुसार राज्यातील एसटी बससेवा ता.२२ मार्चपासून बंद ठेवण्यात आली. त्यामुळे लातूर विभागातील ४५० बस गेल्या ६१ दिवसांपासून बंद स्थितीत होत्या.

दिवसाला महामंडळाचे ५० लाख रुपयांचे उत्पन्न बुडत होते. त्यामुळे महामंडळाचेही अर्थचक्र अडचणीत येत होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानुसार शुक्रवारपासून (ता.२२) ही सेवा सुरू झाली. पण, फारसा प्रतिसाद नसल्याने महामंडळावर ऐनवेळी बस रद्द करण्याची वेळ येत आहे. काही मार्गावर तीन ते चार प्रवासीच प्रवास करताना दिसत आहेत.


विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्याअंतर्गत एसटी बस सेवा सुरू झाली आहे. तिकिटात कसलीही वाढ करण्यात आली नाही. तरी कोरोनामुळे अद्याप प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशी एसटी बसच्या १८४ फेऱ्या या माध्यमातून एक हजार १३९ जणांनी प्रवास केला. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२३) १७६ फेऱ्या झाल्या. या माध्यमातून दोन हजार १६२ जणांनी प्रवास केला. पुढील काही दिवसांत नक्कीच प्रवाशांचा प्रतिसाद वाढलेला पाहायला मिळेल. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी रेणापूर नाका परिसरातील बसस्थानकारून एसटी बस सोडल्या जात आहेत, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

हे आहेत नियम
- बसमधून लहानांना आणि ज्येष्ठांना प्रवास करण्यास बंदी
- सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार
- बसच्या एकुण क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांनाच प्रवासाची मूभा
- बसस्थानकावर आणि बसमध्ये चढताना गर्दी करू नये
- एका आसनावर एकानेच बसावे, प्रवासादरम्यान मास्क बांधावा
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT