corona testing corona testing
मराठवाडा

RTPCR टेस्टला जास्तीचे पैसे घेतल्याने लातुरात लॅबचालकाला दंड

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्ण खासगी लॅबकडून तपासणी करून घेत आहेत

सकाळ वृत्तसेवा

लातूर: सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात शहरातील लॅबला आरटीपीसीआर तसेच अँटीजेन टेस्टसाठी किती दर घ्यावेत याचे बंधन आहे. असे असताना रुग्णाकडून जास्तीचे पैसे घेतल्याप्रकरणी येथील एका लॅबला महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी दहा हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्ण खासगी लॅबकडून तपासणी करून घेत आहेत. शासनाने खासगी लॅबसाठी तपासणीचे ठरावीक दर ठरवून दिले आहेत. असे असतानासुद्धा काही लॅब चालक रुग्णाकडून जास्तीचे पैसे घेत आहेत. काही दिवसापूर्वीच महापालिकेच्या पथकाने येथील दोन लॅबवर दंडात्मक कारवाई केली होती. आता तसाच प्रकार पुन्हा घडला आहे. येथील अंबाजोगाई रोड येथील निर्णय सोनोग्राफी सेंटर (लॅब) या ठिकाणी रुग्णाकडून शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे घेत नसून जास्तीचे पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

याची माहिती मिळाल्यानंतर क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे व त्यांच्या पथकाने या लॅबवर दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. या पथकात स्वच्छता निरीक्षक धोंडिराम सोनवणे, रवी कांबळे यांचा समावेश होता. शहरातील लॅब सेंटर येथे शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम घेत असल्यास नागरिकांना याची माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Latest Marathi News Live Update: व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीसाठी शासनाची मंजुरी

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

SCROLL FOR NEXT