प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना.jpg 
मराठवाडा

प्रती व्यक्ती पाच किलो तांदुळ मिळणार मोफत

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू केली आहे. या योजनेतंर्गत केशरी कार्डधारक (प्राधान्य कुंटूक) व अंत्योदय कार्डधारकांच्या प्रत्येक सदस्याला एप्रिल ते जून या तीन महिन्यासाठी प्रती व्यक्ती पाच किलो तांदुळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत जिल्हा प्रशासनस्तरावर वाटपाबाबत नियोजन होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. हा तांदुळ नियमीत धान्य वाटपाच्या अतिरिक्त आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू  
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने नागरिकांच उपासमारी होवू नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू केली आहे. या योजनेतंर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुंटूब (केशरी कार्ड) व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना पाच किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे. हा मोफत तांदुळ एप्रील, मे व जून अशा तीन महिन्याकरीता देण्यात येणार आहे. 

नियमित धान्याचे वाटप  
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत जिल्ह्यातील केशरी कार्डधारक तसेच अंत्योदय कार्डधारकांच्या कुंटूबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. हा तांदुळ नियमित मिळणाऱ्या धान्याच्या अतिरिक्त आहे. केशरी व अंत्योदय कार्डधारकांना दोन किलो तांदुळ व तीन किलो गहू देण्यात येतो. यात तांदुळ प्रति तीन रुपये किलो व गहू प्रति किलो दोन रुपये दराने मिळतो.

हेही वाचलेच पाहिजे....मद्य शौकीनांना नाही दिलासा

धान्य वाटपाची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीवर
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत केशरी कार्डधारक (प्राधान्य कुंटूक) व अंत्योदय कार्डधारकांच्या प्रत्येक सदस्याला एप्रिल ते जून या तीन महिन्यासाठी प्रती व्यक्ती पाच किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे. हा तांदुळ देतांना लाभधारकांना पॉश मशीनवर अंगठा लावण्याची गरज नाही. परंतु प्रत्येक लाभार्थ्यांना हा तांदुळ मिळावा, यासाठी शासनाने ग्रामस्तरीय समिती नियुक्त केली आहे. यात सरपंच अध्यक्ष, उपाध्यक्ष तलाठी, सचिव ग्रामसेवक तर सदस्य दोन ग्रामपंचायत सदस्य व पोलिस पाटील यांची नियुक्ती केली आहे. ही समिती गावातील प्रत्येक लाभार्थ्यांना मोफत स्वरुपात पाच किलो तांदुळ मिळेल, याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच हा तांदुळ मोफत असल्यामुळे यासाठी पैसे मागीतल्यास रास्त दुकानदाराचा परवाना रद्द करुन त्याच्या विरुद्ध कारवाइ करण्याचा इशारा दिला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चौथ्या T20I मध्ये भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव'या'३ मोठ्या चुकांमुळे मालिका गमावली,गंभीर हतबल, एकटा कर्णधार श्रेयस करणार तरी काय?

Ashta Bhavai Festival : 1200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा! सांगलीच्या आष्ट्यात आजपासून प्रसिद्ध 'भावई उत्सव'; काय आहे खास? महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचं आहे श्रद्धास्थान

Snake Safety in Monsoon : सापाची पिल्ले दिसायला लहान, पण जन्मापासूनच असतात विषारी; पावसाळ्यात शेतात जाताना 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी, सर्पदंशानंतर नकोत घरगुती उपाय

Student End Life : गृहपाठ न केल्याने २० रुपयांचा दंड; आठवीतील विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून उचललं टोकाचं पाऊल, नोटमध्ये नेमकं काय?

दोन्ही भाऊ इंडस्ट्रीत, चांगलं कमावता, एकत्र कुटुंबात राहता मग घरखर्च कोण करतं? अधोक्षज कऱ्हाडेने सांगितलं आर्थिक गणित

SCROLL FOR NEXT