parbani soyabean parbani soyabean
मराठवाडा

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, सोयाबीन पिकात किडरोगांचा प्रादुर्भाव

काही भागात सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळया या किडींचा देखिल प्रादुर्भाव दिसुन येत आहे

गणेश पांडे

काही भागात सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळया या किडींचा देखिल प्रादुर्भाव दिसुन येत आहे

परभणी: जिल्ह्यातील सोयाबीन पिकात किडी व रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्‍या पथकांनी सोमवारी (ता. नऊ) जिल्‍ह्यातील राहटी व कात्‍नेश्‍वर शिवारातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. या पथकात विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी मेहत्रे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ. गजानन गडदे, मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. रामप्रसाद खंदारे, वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ डॉ. विक्रम घोळवे, किटक शास्‍त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव तसेच कृषि विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे व तालुका कृषि अधिकारी परभणी प्रभाकर बनसावडे आदीचा समावेश होता.

या पथकांनी सोयाबीन पिकांची पाहणी केली असता काही ठिकाणी कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. या पाहणी दरम्‍यान अनेक ठिकाणी जस्त व लोहची कमतरता आढळून आली. त्यामुळे सोयाबीनची पाने पिवळसर दिसत आहेत. जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी व त्यानंतर पावसाचा पडलेला खंड, वाढलेले तापमान त्याच बरोबर दिवस व रात्र या मधील तापमानाची तफावत यामुळे सोयाबीन पिकावर मावा, तुडतुडे व पांढरीमाशी यांचा प्रार्दुभाव सुरु झालेला दिसून येत आहे.

विषाणुजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता

पुढे असेच वातावरण राहिल्यास रसशोषण करणाऱ्या किडींचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन सोयाबीन माझॅक व पिवळा मोझॅक या विषाणुजन्य रोगांचा प्रसारण होण्याची शक्यता असल्‍याचे शंका व्‍यक्‍त केली. काही भागात सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळया या किडींचा देखिल प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सोयाबीन पिकांवरील कीड व रोग प्रादुर्भाव पाहता विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी पुढील उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

या आहेत उपाययोजना

- चिलेटेड झिंक व लोह यांची प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति दहा लीटर पाण्यामध्ये घेवुन फवारणी करावी

- विद्राव्य सुक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड-२ ची ५० मिली प्रति दहा लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

- सोयाबीन पीकात एकरी १५ पिवळे व ५ निळे चिकट सापळे लावावे,

- इंग्रजी टि आकाराचे २० पक्षी थांबे उभारावे

- एकरी चार कामगंध सापळे लावावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT