high court high court
मराठवाडा

मराठवाड्यातील मराठ्यांचा ओबीसीत समावेशासाठी न्यायालयात याचिका

ॲड. गजानन कदम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे

प्रकाश बनकर

औरंगाबाद: ‘‘मराठवाड्यातील मराठा समाजाचा (maratha reservation) ओबीसीमध्ये समावेश करून शैक्षणिक व नोकरीतील अनुशेष भरून काढावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे’’, अशी माहिती याचिकाकर्ते तथा छावा मराठा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी शनिवारी (ता. पाच) पत्रकार परिषदेत दिली.

चव्हाण म्हणाले, ‘‘खासदार काकासाहेब कालेलकर आयोगाने वर्ष १९५५ मध्ये हैदराबाद स्टेटमधील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होता. आंध्रप्रदेशातील मराठा ओबीसीत आहेत. मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला. त्यानंतर हे आरक्षण काढण्यात आले. घटनेचे ३७१ व्या उपकलमाद्वारे एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात समाविष्ट झालेल्या भागांना घटनात्मक संरक्षण दिलेले आहे.

महाराष्ट्र सरकारने १९६७ ला ओबीसी १८० जातींची यादी जाहीर केली. त्याच यादीत १८१ व्या क्रमांकावर मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. हा अन्याय महाराष्ट्र सरकारने केला असल्याने न्याय मिळावा म्हणून आम्ही ॲड. गजानन कदम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे’’, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT