Parbhani Accident  sakal
मराठवाडा

Parbhani Accident : पिकअपची जीपला धडक;ताडकळसजवळ दोघे ठार

गंगाजी बापू येथे जावळाच्या व धार्मिक कार्यक्रमाला जात असताना झालेल्या अपघातात जिंतूर तालुक्यातील कोक येथील एकाचा जागीच, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तसेच वाहनातील इतर दहा-बारा नातेवाईक जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

ताडकळस : गंगाजी बापू येथे जावळाच्या व धार्मिक कार्यक्रमाला जात असताना झालेल्या अपघातात जिंतूर तालुक्यातील कोक येथील एकाचा जागीच, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तसेच वाहनातील इतर दहा-बारा नातेवाईक जखमी झाले. ही घटना ताडकळस-पूर्णा रस्त्यावर गुरुवारी (ता. ६) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र गंगाजी बापू येथे जावळं काढण्यासाठी व धार्मिक विधी करण्यासाठी बोलेरो जीपमधून (एमएच ०४ एचडी ९१६३) कोक, शेक, साडेगाव येथील नातेवाईक जात होते. शेक येथील नृसिंह जिजाभाऊ गलांडे यांच्या सोहम या लहान मुलाचा जावळं काढण्याचा कार्यक्रम होता.

गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास ताडकळस येथून दोन किलोमीटर अंतरावर पूर्णा रस्त्यावर लघुशंकेसाठी बोलेरो वाहनातील नातेवाईक खाली उतरले. याचवेळी ताडकळसकडून नांदेडकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ‘पिकअप’ने (एमएच २० जीसी ०९३४) रस्त्यावर थांबलेल्या बोलेरोला धडक दिली.

या धडकेत प्रसाद बापूराव गारुडी (वय ४५, रा. कोक) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील प्रसाद गारुडी (वय १६) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नांदेड येथे दाखल करण्यात आले असता, त्याचा मृत्यू झाला. तर अपघातात दहा ते बारा जण जखमी असून, त्यांना उपचारासाठी परभणी, नांदेड येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT