goakshnath 
मराठवाडा

पौष पौर्णिमेपासूनची येथील यात्रा भाविकांमुळे गजबजली

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः वाई गोरक्षनाथ (ता.वसमत, जि.हिंगोली) येथे असलेले गोरक्षनाथाचे मंदिर भाविकांचे श्रध्दास्‍थान असून येथे पौष महिण्यातील पौर्णिमेपासून यात्रा महोत्‍सव असतो. तो सर्वदुर परिचित असून पोळ्यानिमित्त येथे गोरक्षनाथाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बैलजोड्या घेवून येण्याची परंपरा आहे. सध्या सुरू असलेल्या यात्रा महोत्‍सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

वसमत तालुक्‍यात येणारे वाई हे गाव येथे असलेल्या गोरक्षनाथाच्या मंदिरावरून गावाचे नाव देखील वाई गोरक्षनाथ पडले आहे. गावात तीन हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. येथे अनेक वर्षांपासुन गुरु गोरक्षनाथाचे मंदिर आहे. येथे पुर्वी असलेल्या मंदिराचा ग्रामस्‍थांनी जिर्णोध्दार करून मंदिराचे नव्याने बांधकाम केले आहे.

परजिल्‍ह्यातील शेतकरी येतात बैलपोळ्याला
या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमासह बैलपोळ्याला शेतकरी बैलांना मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी येथे घेवून येतात. यात ऐंशी ते नव्वद हजार बैल सहभागी असतात. येथे जिल्‍हाभरासह वाशीम, नांदेड, परभणी आदी जिल्‍ह्यांतील शेतकरी देखील येतात. यामुळे येथून जाणाऱ्या राष्‍ट्रीय महामार्गाची दोन दिवस वाहतूक व्यवस्‍था बदलण्यात येते. ही अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे.

मंदिरात सात दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम
या वेळी येथे सहभागी झालेल्या बैलजोड्यांच्या तपासणीसाठी पशुवैद्यकीय विभागातील तज्ज्ञ येथे येवून बैलांची मोफत तपासणी करून औषधोपचार करतात तर ग्रामस्‍थ येथे सहभागी होणाऱ्या पशुपालकांच्या चहा, नास्‍त्‍याची व्यवस्‍था करतात. यामुळे दोन दिवसांचा हा उत्‍सव मोठ्या थाटात साजरा होतो. त्‍यानंतर पौष महिण्याच्या पोर्णिमेपासून सुरू होणारा यात्रामहोत्‍सव सर्वदूर प्रसिध्द आहे. यात्रेनिमित्त मंदिरात सात दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून शनिवारी (ता.११) विठ्ठल रुक्‍मिनी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा विठ्ठल गुरू व सुधीर महाराज शिरडकर यांच्या हस्‍ते करण्यात आली.

पालखी मिरवणूकीत जागरणाचा कार्यक्रम
येथे सुरू असलेल्या सप्ताहानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच जय भवानी कला मंचातर्फे जागरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सप्ताहानिमित नामवंत किर्तनकारांचे किर्तन सुरू आहेत. शनिवारी (ता.१८) सकाळी नऊ ते अकरा यावेळात पिंपराळेकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्‍यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

गंगनचुंबी आकाळपाळणे बच्चे कंपनीचे आकर्षण
यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात बेलफुल, प्रसादालय, धार्मिक साहित्य विक्रीची दुकाने यासह सौंदर्य प्रसाधने विक्रीची स्‍टॉल, भांडे विक्रेते, बांगड्या विक्रेते, हॉटेल उभारण्यात आली असून बच्चे कंपनीसाठी गंगनचुंबी आकाळपाळणे आकर्षण ठरत आहे. यात्रेनिमित्त जिल्‍हाभरासह परभणी, नांदेड, वाशीम आदी ठिकाणीचे भाविक यात सहभागी झाले असून येथे धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. दर्शनासाठी देखील भाविकांची येथे गर्दी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT