The pilgrimage of Ramchandra Maharaj and Jagdamba Devi at Kalamanuri has been canceled due to rising corona.jpg 
मराठवाडा

कोरोनाच्या सावटामुळे कळमनुरी येथील रामचंद्र महाराज, जगदंबा देवीची यात्रा रद्द

संजय कापसे

कळमनुरी (हिंगोली) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या येथील रामचंद्र महाराज, जगदंबा देवीची सोमवार (ता. १५) नियोजित असलेली यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने मंदिर परिसराला बॅरिकेट्स लावून या भागात जाण्यास मज्जाव केला आहे.

येथील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या रामचंद्र महाराज, जगदंबा देवीची यात्रा दरवर्षी महाशिवरात्र झाल्यानंतर पाचव्या दिवशी आयोजित केली जाते. यात्रेकरिता राज्यभरामधून बंजारा समाजातील भाविक यात्रेनिमित्त दरवर्षी येथे मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात कोरोना वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाकडून रामचंद्र महाराज, जगदंबा देवीच्या यात्रेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. सोमवार आणि मंगळवारी देवस्थानची नियोजित यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मंदिराच्या विश्वस्तांनी सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करून यात्रेनिमित्त बाहेरगावच्या भाविकांना दर्शनासाठी येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या यात्रेवर निर्बंध घातले असून या ठिकाणी भाविकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आता प्रशासनाला आदेशित केले आहे. पोलिस प्रशासनाने रामचंद्र महाराज, जगदंबा देवी मंदिराच्या परिसराला संपूर्णपणे बॅरिकेट्स लावून परिसरात कुठल्याही भाविकाला जाण्यास प्रतिबंध केला आहे.

बंजारा समाजातील भाविकांनी यावर्षी यात्रेनिमित्त दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मंदिराचे विश्वस्त कुंदन महाराज, पांडुरंग राठोड, गोवर्धन राठोड, सुभाष  राठोड, बाबुसिंग राठोड, सुरेश देशमुख, अनिल परसराम आडे, सुभाष राठोड, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT