Gorakh Phade Sakal
मराठवाडा

Bidkin News : प्लायवुड दुकान चालकाने गळफास घेत संपविले जीवन; कारण अद्याप अस्पष्ट..

बिडकिन येथील निलजगाव रोडवरील प्लायवुड व डोअर शॉप चालकाने दुकानातच गळफास लावून जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

बिडकिन - येथील निलजगाव रोडवरील प्लायवुड व डोअर शॉप चालकाने दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (ता. २६) शुक्रवार रोजी अंदाजे १.०० वाजता उघडकिस आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गोरख विठ्ठल फडे (वय-३० वर्षे) रा. खादगाव. ता. पैठण, हल्ली मुक्काम डिलक्स पार्क शेजारी बिडकिन, ता. पैठण असे आहे.

गोरख फडे हा मागील काही वर्षांपासून ओम साई प्लायवुड डोअर ॲड ग्लास या नावाने दुकान चालवत होता. आज (ता. २६) रोजी दररोज प्रमाणे दुकान उघडुन नियमितपणे कामकाज करत असताना अचानक कुठल्यातरी अज्ञात कारणांमुळे हा निर्णय घेतला असावा अशी शंका शेजारी असलेल्या दुकानदार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

बिडकिन पोलिस ठाण्याचे हाकेच्या अंतरावर हि घटना घडली असुन, घटनेची माहिती मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल संदिप धनेधर व अमोल मगर यांनी पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वेदपाठक यांनी मृत घोषित करत शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

बिडकिन पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढिल तपास पोलिस कर्मचारी करत आहेत. मयत गोरख फडे यांच्या कुटुंबियांच्या वतीने हि आत्महत्या करण्याचे कारण हे कर्जबाजारीपणा व सावकारी कर्जामुळे आत्महत्या केली असावी असा आरोप नातेवाईकांच्या वतीने केला जात आहे. याबाबत बिडकिन पोलिस ठाणे येथे अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : ‘सरसकट’ शब्द काढून टाका, जरांगे यांची मागणी; महाराष्ट्र ठप्प करण्याचा इशारा

Maratha Reservation : निवृत्त सैनिकांचा संताप; देशासाठी लढलो, आता हक्कासाठी लढतोय!

आजचे राशिभविष्य - 1 सप्टेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 सप्टेंबर 2025

अग्रलेख : बिहारी सत्तायात्रा

SCROLL FOR NEXT