Mahadev Jankar 
मराठवाडा

PM Modi Rally: माझ्या लहान भावाला निवडून द्या ! मोदींचे आवाहन, जानकरांनी वाजवली शिट्टी

PM narendra Modi Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात आले आहेत.

कार्तिक पुजारी

परभणी- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात आले आहेत. नांदेडमध्ये चिखलीकरांसाठी सभा घेतल्यानंतर मोदी रासपचे महादेव जानकर यांचा प्रचार करण्यासाठी परभणीमध्ये आले होते. याठिकाणी मोदींनी भव्य सभा घेतली. मोदींनी यावेळी जानकर यांचा उल्लेख छोटा भाऊ असा केला. यावेळी जानकर यांनी मोदींनी दिलेली शिट्टी वाजवल्याचं दिसून आलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या विकासासाठी एनडीए युतीला जनतेचा आर्शीर्वाद हवा आहे. त्यामुळे माझे भाऊ महादेव जानकर यांना विजयी करायचं आहे.' मोदींनी जानकर यांना जवळ बोलावलं आणि त्यांना शिट्टी हातात दिली. यावेळी जानकर यांनी शिट्टी वाजवत जनतेला अभिवाद केलं. जमलेल्या लोकांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

देशातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडले. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नांदेड आणि परभणी येथे आले होते. यावेळी मोदी यांनी लोकांना संबोधित केले.

परभणी आत्मनिर्भर भारत बनवण्यात मदत करणार आहे. ही निवडणूक देशाच्या आर्थिक विकासाची नांदी आहे. मला गरिबांच्या वेदना माहिती आहेत. त्यांच्या वेदना कशा कमी होतील याबाबत मी विचार करत असतो. मराठवाड्यात आणलेल्या योजना रोखण्याचं काम विरोधकांनी केलं. मराठवाड्यासाठी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं मोदी यावेळी सभेत म्हणाले.

मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की लोकांनी इंडिया आघाडीपासून दूर राहावं. काँग्रेसला मूळ नाही, शेंडा नाही. जो कोणी काँग्रेसजवळ जातो तो स्वत: निरस होऊन जातो. काँग्रेसच्या काळात इथे निजामासारखं राज्य सुरु होतं. मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्न दूर करण्यात आला नाही. ही संताची भूमी आहे. पण, काँग्रेसकडून या भूमीकडे दुर्लक्ष झालं. (PM Narendra Modi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT