file photo 
मराठवाडा

 ‘एटीएम’ जळीतप्रकरणी ‘त्या’ दोघांना जेलची हवा !

सकाळ वृत्तसेवा

परभणी : भारतीय स्टेट बँकेचे ‘एटीएम’ जाळणाऱ्या दोन आरोपींना नवा मोंढा पोलिसांनी शुक्रवारी (ता. सहा) पहाटे बोरी (ता. जिंतूर) येथून ताब्यात घेतले. या दोघांनाही न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

परभणी शहरातील नेहरू रोडवर असलेले भारतीय स्टेट बँक शाखेचे ‘एटीएम’ सेंटर बुधवारी (ता. चार) जळाले होते. सुरवातीला शॉर्ट सर्किटने आग लागली असावी, असा अंदाज बांधला जात होता. यामुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान, बँकेच्या एटीएममध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजची तपासणी गुरुवारी (ता. पाच) पोलिसांनी केली. यात एक व्यक्ती एटीएम मशीनवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिल्याचे दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोन संशयीतांना शुक्रवारी (ता. सहा) पहाटे बोरी (ता. जिंतूर) येथून ताब्यात घेतले. यात नंदकुमार गोपाळराव पुरी व गोविंद रामेश्वर अंभोरे (दोघेही रा. संजयनगर, बोरी, ता. जिंतूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पैशाची नोंद होत नसल्याने केला प्रकार
पाच दिवसांपूर्वी गोविंद रामेश्वर अंभोरे यांचे पैसे घेऊन नंदकुमार गोपाळ पुरी हा बँकेत गेला होता. त्याने जमा केलेल्या पैशाची नोंद होत नसल्याने तो वैतागला होता, त्याने याची तक्रार बँकेकडे केली होती. परंतु, बँकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नंदकुमार गोपाळ पुरी याने हा प्रकार केल्याची माहिती नवामोंढा पोलिसांनी दिली.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2026

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

SCROLL FOR NEXT