क्राईम न्यूज 
मराठवाडा

पोलिस महिलेचे दागिणे पळविणाऱ्यास मुद्देमालासह अटक; हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा

वसमत शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली महिला अंमलदाराची दोन दिवसापूर्वी रस्त्यात आडवुन तिचे सोन्याचे दागीणे पळविले होते. मात्र या प्रकरणी आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासाच्या आत ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : वसमत येथील महिला पोलिस (Hingoli Lady plice) अंमलदाराचे दागिणे पळविणाऱ्या आरोपीस २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) ताब्यात घेतले असल्याची माहिती शुक्रवारी (ता. सात) देण्यात आली. आरोपीकडून सोन्याचे दागिणे (gold jwelary) व एक दुचाकी असा ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Police arrest woman's jewelery smuggler with issue; Hingoli Local Crime Branch

वसमत शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली महिला अंमलदाराची दोन दिवसापूर्वी रस्त्यात आडवुन तिचे सोन्याचे दागीणे पळविले होते. मात्र या प्रकरणी आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासाच्या आत ताब्यात घेवुन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरलेले गंठण असा ९६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी चिंतामणी नादरे रा. माळवटा (ता. वसमत ) हा वसमतमधील एका दुचाकी एजन्सीसमोर मुख्य रस्त्यावर दुचाकी ( एमएच ३८ एस १६७२) वर येवुन महिला पोलिसाला अडविले.

हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जपणे आवश्यक असून कोरोनाबाबतची काळजी व सुरक्षित वर्तन मुलांकडूनही होणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

त्यांच्याकडून जबरीने सोन्याचे दागीणे पळविले अशी माहिती मिळाले वरुन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांचे सुचनेनुसार पोलिस निरीक्षक उदय खंडेराय व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंतामणी यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. एवढेच नाही तर त्याच्या ताब्यातुन सदर महिलेचे चोरीस गेलेले एक तोळा वजनाचे गंठन किंमती ४६ हजारचे व एक दुचाकी (एमएच ३८ एस १६७२) अंदाजे किंमती ५० हजार असा एकुण ९६ हजारांचा मुद्देमालासह जप्त केला. या कारवाईत फौजदार शिवसांब घेवारे , किशोर पोटे, अंमलदार बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, किशोर सावंत, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT