फोटो 
मराठवाडा

पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आणखी एक घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथे बुधवारी (ता. २६) सकाळी उघडकीस आली होती. एका पाच वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिला गावशेजारी असलेल्या नाल्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला सोनखेड पोलिसांनी अटक केली. त्याला गुरूवारी (ता. २८) लोहा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पाच दिवसाच्या पोलिस कोठडीत केली आहे.
 
नराधम सुग्रीव मोरोला पोलिस कोठडी  

पीडीत बालिकेला नग्नावस्थेत सोडून हा नराधम रात्रीच फरार झाला. आरोपीविरुद्ध अत्याचार व पोक्सोअंतर्गत सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नराधम आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.

जिल्ह्यात पुन्हा अत्याचाराची घटना

लोहा तालुक्यातील सोनखेड येथील एका पाच वर्षीय चिमुकली ही आपल्या अंगणात मंगळवारी (ता. २५) खेळत होती. यावेळी तिथे येऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला खाऊचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. आपली बालिका कुठे गेली याचा शोध नातेवाईकांनी सर्वत्र घेतला. परंतु ती सापडली नाही. याप्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात अज्ञातविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

वरिष्ठ पोलिस  अधिकाऱ्यांची भेट

बुधवारी नातेवाईक गाव परिसरातील नाले, ओढे, विहीर आदी ठिकाणी तिचा शोध घेत असता ती एका नाल्यात बेशुध्दावस्थेत सापडली. लगेच सोनखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत तिला नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. चिमुकलीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले मात्र तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरीक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी सोनखेड गाठले. या घटनेच्या निषेधार्थ सोनखेड कडकडीत बंद पाळण्यात आला. 

नराधमाला फाशीची शिक्षा- विविध संघटनांची मागणी

चिमुकलीचं अपहरण करणारा तो अज्ञात आरोपी कोण याची माहिती पोलीसानी काढली. आरोपी सुग्रीव मोरे (व. २२) याच्या मुसक्या आवळल्या. पीडित चिमुकलीवर सध्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. दरम्यान या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या मुसक्या तात्काळ आवळा अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. घटनेच्या निषेधार्थ विविद ठिकाणी बंद पाळल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT