udgir police 
मराठवाडा

उदगीर शहरात आठशे वाहनधारकांकडून पावणेदोन लाखांचा दंड वसूल

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : उदगीर शहरामध्ये टाळेबंदीच्या २१ दिवसांत कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नियम मोडणाऱ्या ८२१ वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ऐंशी हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली.


उदगीर शहरात गेल्या वीस दिवसांपासून टाळेबंदी लागू आहे. यात फक्त अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. यादरम्यान व अत्यावश्यक सेवेच्या कारणाव्यतिरिक्त विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्या दुचाकी, तीनचाकी व काही चारचाकी वाहनांची तपासणी करून त्यांना संचारबंदीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. यादरम्यान वाहतुकीचे व संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या ८२१ वाहनधारकांवर कार्यवाही करून त्यांच्याकडून दोनशे, तीनशे, पाचशे याप्रकारे गुन्ह्यांचे स्वरूप पाहून एक लाख ऐंशी हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे श्री.शर्मा यांनी सांगितले.
याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क न घालणे रस्त्यावर थुंकणे, सामाजिक अंतर न राखणे यासंदर्भात काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेला सहकार्य केले. पालिका पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कार्यवाहीत जवळपास सहाशे जणांवर कारवाई करून एक लाख २० हजारांचा दंड आकारण्याची कार्यवाही करण्यासाठी नगरपालिकेच्या पथकाला सहकार्य केल्याचे श्री. शर्मा यांनी सांगितले.


टाळेबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, विविध पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. जास्तीत-जास्त गर्दी जमा होणाऱ्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला असून, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जास्त गर्दी होऊ न देणे यासाठी नियंत्रण ठेवण्यात येत आहे. शिवाय यादरम्यान वाहतुकीचे व टाळेबंदीचे नियम मोडणाऱ्या व्यक्ती व वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड आकारण्यात येत आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
दिवसेंदिवस राज्यांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये. बाहेर पडत असताना तोंडाला मास्क वापरावा. व्यवस्थित अंतर ठेवून खरेदी-विक्री करावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक शर्मा यांनी केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT