file photo 
मराठवाडा

कायद्याच्या कचाट्यातील  दुचाकी धूळखात !

सकाळ वृत्तसेवा

परभणी : शहरातील तिन्ही पोलिस ठाण्याच्या परिसरात पहाल तिकडे जुन्या, गंजून गेलेल्या सायकली, मोटारसायकलींचा खच पडलेला दिसतो. धूळखात पडलेली ही वाहने कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने वर्षानुवर्षांपासून एकाच जागेवर ठेवण्यात आल्याने अनेक दुचाकी जागेवरच गंजून गेल्याचे चित्र आहे.


परभणी शहरातील नानलपेठ, नवामोंढा व कोतवाली पोलिस ठाण्याच्या परिसरात अशा कित्येक दुचाकींसह सायकली दिसून येतात. गुन्ह्यांच्या तपासात जप्त करण्यात आलेलीही वाहने जोपर्यंत गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, निकाल पूर्णपणे लागत नाही, तोपर्यंतही वाहने पोलिस ठाण्यातच ठेवली जातात. तर, अनेक दुचाकी या अपघातातील, तर काही इंजीन बदलेले, चेसीस क्रमांकावर खाडाखोड असतात. मात्र, सद्यःस्थितीत शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यांच्या परिसरात शेकडो वाहनांचा खच दिसून येत आहे. वर्षानुवर्षांपासून ठाण्याच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी वाहनांची थप्पी करून ठेवली आहे.

वाहने वापरण्यास टाळतात...
मागील काही वर्षांत गुन्ह्याचा तपास झालेली दुचाकी वाहने ज्या त्या मालकास परत करण्यात येत आहेत. मात्र, याची संख्या कमी असते. कारण, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच वाहने वाहनधारकांच्या ताब्यात दिल्या जातात. वेळप्रसंगी वाहनमालकाचाही शोध पोलिस यंत्रणेलाच घ्यावा लागतो. नानलपेठ, कोतवाली व नवामोंढा पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात अशी असंख्य दुचाकी वाहने पडली आहेत. अनेक दुचाकी या अपघातातील असतात. अपघातातील वाहने नागरिक शक्यतो वापरण्याचे टाळतात. शिवाय, रस्त्यावर, चोरीच्या तपासातून सापडलेल्या दुचाकी वर्षानुवर्षांपासून ठाणे परिसरात पडून असतात. धुळीने माखलेली ही वाहने कालांतराने भंगारात काढण्यालायक होतात. वार्षिक तपासणी दरम्यान, या वाहनांवरची काहीशी धूळ झटकली जात असावी.


कालांतराने ‘बेवारस’
पोलिस ठाण्यातील मोकळी जागा हमखास या दुचाकींनी व्यापलेली दिसून येते. ही वाहने कोणाच्या उपयोगात नसल्याने जागेवरच खराब होत आहेत. वाहनधारकांनी वेळेत संपर्क साधला तर वाहने मिळतातही. मात्र, चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या दुचाकी परजिल्ह्यातीलही असतात. संबंधित दुचाकीधारक पोलिस ठाण्यात येण्यास धजावत असल्यानेही अशा दुचाकी कालांतराने ‘बेवारस’ होत आहेत.


वाहनांचा शुक्रवारी लिलाव
नवामोंढा पोलिस ठाणे परिसरात ठेवलेल्या ‘बेवारस’ दुचाकी अनेक आहेत. अशा ‘बेवारस’ दुचाकींचा लिलाव शुक्रवारी करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांची दुचाकी चोरीस गेली आहे, हरवली आहे, त्यांचा अद्याप तपास लागला नाही, अशांनी कागदपत्रांसह नवामोंढा पोलिसांशी संपर्क साधावा. कागदपत्रांची तपासणी करून वाहने दिल्या जातील, अन्यथा शुक्रवारी (ता. सात) वाहनांचा लिलाव करण्यात येईल.
- रामेश्वर तट,
पोलिस निरीक्षक, नवामोंढा पोलिस ठाणे, परभणी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT