Maharashtra-Police 
मराठवाडा

पोलिस म्हणताहेत, 'कुणी घर देता का घर?'

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कर्तव्य कठोर खात्यात काम करतांना कर्तव्यासोबतच पोलिसांना चांगल्या निवाऱ्याची आवश्‍यकता आहे, परंतु स्नेहनगर पोलिस वसाहतीत पोलिसांच्या घरांवर पोलिस अधिक्षक कार्यालयातील ‘बाबूंनी’ नियमबाह्यरित्या कब्जा केला आहे. त्यामुळे पोलिसांना खासगी घरांकडे वळावे लागत आहे. त्याचा थेट परिणाम त्यांच्या खर्चावर पडत असल्याने त्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते. 

नांदेड शहर व आसपासच्या परिसरातील पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांना आपल्या मुख्यालयापासून जवळ असलेल्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यात येते. जसे की, सोनखेड, लिंबगाव, मुदखेड, बारड आणि ग्रामीण सह शहरातील पाचही पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यासाठी स्नेहनगर पोलिस वसाहतीत निवासस्थाने आहेत.

अगोदरच राहण्यायोग्य नसलेल्या घरावरही कार्यालयीन बाबूंनी कब्जा केला आहे. खरे तर मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना स्नेहनगर शासकीय वसाहतीत घरे आहेत, परंतु काही कर्मचारी वरिष्ठांना आपलेसे करून पोलिसांच्या घरावर ताबा मिळवत आहेत. वसाहतीतील निलगिरी, जायकवाडी (डी) आणि जायकवाडी (सी) या इमारतीत तब्बल आठ कर्मचाऱ्यांनी आपले बिऱ्हाड थाटले आहे. त्यामुळे अनेक पोलिसांना घर घेण्यासाठी बाहेरचा रस्ता धरावा लागत आहे.

या आठ कर्मचाऱ्यांनी नियमबाह्यरित्या घरावर केलेला कब्जा हा पोलिसांनाचा कायदा शिकविणारा दिसतो. तसेच काही पोलिस कर्मचाऱ्यांना हवालदारांसाठी असलेली घरे देण्यात आल्याचाही धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पोलिस वसाहतीत चाललेल्या या गोंधळाकडे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांना हक्काची घरे मिळत नसल्याने त्याचा परिणाम त्याच्या कर्तव्यावर होत असल्याचे बोलले जाते.

या प्रकरणी पोलिस कल्याण विभागाशी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. पोलिसांच्या शासकीय घरावर अन्य व्यक्तीचा ताबा असणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Satara Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; वनधिकाऱ्यांना निलंबित करेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही, नागरिकांचा आक्रमक पवित्रा

16 तास उपवास, रोज 6 KM चालणं; 61 व्या वर्षी निवेदिता 'असा' आहे सराफ फिटनेस मंत्रा? म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : उद्धव-राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT