मराठवाडा

अवैध वाळू उपशावर पोलिसांचा छापा 

सकाळवृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवत टेम्पोमधून पोलसांनी थेट बळेगाव (नायगाव) घाट गाठला. तेथून तीन जणांना अटक करून ट्रक्टर्स व पोकलेन मशीनसह नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. 14) पहाटे दीडच्या सुमारास केली.

कुंटूर, नायगाव, देगलूर, धर्माबाद, नांदेड या भागातून अवैध वाळू उपसा महसुल विभागाच्या नाकावर टिच्चुन वाळू माफिया करीत आहेत. गोदावरी, लेंडी, मांजरा या नद्यांची वाळू उपसा झाल्याने चाळणी झाली आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नैसर्गीक पर्यावरण ढासळत चालले आहे. नदी पात्रात केलेल्या खड्ड्यामुळे अनेक जिवीत हाणी घडत आहे. परंतु, या वाळु माफियांना महुसल विभाग अभय देत असल्याचे दिसून येते. रस्त्यांची धूळधान उडत असून रस्ता परिसरात पिकांवर धुळीचे लोट निर्माण झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

मिळालेल्या माहितीवरुन बिलोली उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांनी आपल्या पथकाला वाळू वाहतुक करणाऱ्या टेम्पोतूनच बळेगाव (ता. नायगाव) घाटावर कारवाईसाठी पाठविले. रविवारी (ता. 14) पहाटे दीड वाजता हे पथक घाटावर धडकताच अनेकांचे धाबे दणाणले. पोलिसांनी साहेबराव सटवाजी पंदेवाड, गंगाधर माधवराव बेलकर यांना अटक केली. तसेच घाटावरून विनापरवानगी अवैध वाळू उपसा करणारी पोकलेन मशिन आणि वाहतुकीसाठी थांबलेले चार ट्रॅक्टर्स असा नऊ लाख तीन हजाराचा मुद्देमाल जप्त केला. एपीआय शरद मरे यांच्या फिर्यादीवरुन कुंटूर ठाण्यात वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार एस. एस. कुमरे हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT