police raid on cafe of gangapur 20 youth arrested for offensive  sakal
मराठवाडा

गंगापूरात कॅफेवर पोलिसांनी धाड; वीस तरुण-तरुणी ताब्यात

पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्याकडून एक तास समुदेशन

बाळासाहेब लोणे

गंगापूर : शहरातील वैजापूर महामार्गावर न्यू हायस्कूल शाळेसमोरील एका कॅफेवर पोलिसांनी धाड मारली. छाप्यात पंधरा ते वीस तरुण-तरुणी इथे बसून अश्‍लील चाळे करत असताना आढळून आले. पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईची माहिती कळताच परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात शेकडो तरुण कोण कोण पकडल आहे ? हे पाहण्यास आले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तरुणांचे पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्याकडून एक तास समुदेशन केले. व सोडून देण्यात आले.

या कारवाईने कॅफे चालक आणि प्रेमीयुगुलांचे धाबे दणाणले आहेत. शिक्षणासाठी अनेक युवक-युवती शहरात येतात. महाविद्यालयाच्या वेळेत अनेकजण पिझ्झा, चहा-कॉफी घेण्यासाठी परिसरात जातात. परंतु, काही कॅफेचालक हॉटेलच्या नावाखाली वेगळे कारनामे करताना आढळून येत आहेत.

येथील कॅफेच्या आत आडोसा निर्माण करण्यात आला आहे. पोलिसांच्या भूमिकेचे महाविद्यालय व पालकांनी समाधान व्यक्त केले. काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागात शाळा महाविद्यालयांच्या परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत.या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सक्रिय झाले आहे.

विद्यार्थ्यानी शैक्षणिक जीवनात शिक्षण पूर्ण करावे. कुठल्याही कॅफे, हॉटेल अथवा इतर ठिकाणी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. धाड टाकून तत्काळ कारवाई केली जाईल, कॅफे चालकांनी कॅफेत आडोसा केल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल.

_ सत्यजित ताईतवाले (पोलिस निरीक्षक, गंगापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Durga Visarjan Tragedy : दसऱ्याच्या उत्सवाला गालबोट, दुर्गादेवीचे विसर्जन करताना ६ तरुण बुडाले, दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ

Georai News : गेवराईच्या नदीकाठावरील त्या पूरग्रस्तांना चिखलातच दसरा साजरा करण्याची आली वेळ; चिखलाच्या खचाने साफसफाई करण्यासाठी कमी पडला अवधी

Latest Marathi News Live Update : तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार

Thane News: खबरदार! टिळा आणि बांगड्या घालून याल तर...; खासगी शाळेचा विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

SCROLL FOR NEXT