पोलिस मुख्यालयाच्या जागेत उभारण्यात येत आहे पेट्रोलपंप 
मराठवाडा

Video : पोलिस उभारताहेत पेट्रोलपंप...!

गणेश पांडे

परभणी : परभणीत पोलिस उभारताहेत पेट्रोलपंप...! ऐकून आवाक्क झालात ना..! मात्र, हे खरं आहे. पोलिस कल्याण निधीच्या माध्यमातून परभणी पोलिसांना इंडियन ऑईलचा पेट्रोलपंप उभारण्यास परवानगी मिळाली आहे. पेट्रोलपंपाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठ ते दहा दिवसांत हा पेट्रोलपंप कार्यान्वित केला जाईल.

पोलिस हे सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी असतात. परंत, जनतेच्या संरक्षणासाठी २४ तास घराबाहेर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षिततेचे काय? अधिच वेतन कमी, त्यात त्यांची आर्थिक सुरक्षादेखील धोक्यात येते. यासाठी पोलिस कल्याण निधीच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबासाठी निधी उभारून त्यातून विविध उपक्रम घेतले जातात. पोलिस कल्याणासाठी परभणीचे पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या संकल्पनेतून पोलिस दलाने चक्क पेट्रोलपंप उभारला आहे. परभणी शहरात असणाऱ्या जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मोकळ्या व रस्त्यालगत असणाऱ्या जागेचा पुरेपूर उत्पन्नासाठी उपयोग करून घेऊन पोलिसांनी या पेट्रोलपंपाची उभारणी सुरू केली आहे. पोलिसांचा हा प्रयत्न आजचा नाही तर गेल्या दहा वर्षांपासून पेट्रोलपंपाच्या मान्यतेसाठी पोलिस दल प्रयत्न करत होते. पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सातत्याने पाठपुरावा करून व योग्य तो पत्रव्यहार करून या पंपाची मान्यता मिळविली आहे.

वरिष्ठ कार्यालयाचे नाहारकत प्राप्त 
पेट्रोलपंप उभारणीसाठी पोलिसांना पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांची विशेष परवानगी घ्यावी लागते. ती मिळविण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना यश आले. पोलिस महासंचालकांच्या मान्यतेनंतरच या पेट्रोलपंपाची उभारणी सुरू करण्यात आली आहे.

इंडियन ऑईल कॉर्पेरेशनकडून मदत
हा पेट्रोलपंप उभारणीसाठी पोलिसांना इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची मोठी मदत झाली आहे. पंपासाठी लागणारे साहित्य, मशीन व पेट्रोलपंपाचे बांधकाम हे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून पुरवठा केले जात आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते जिल्हा पोलिस दलाकडे हस्तांतरित केले जाईल.

पोलिस बॉयसाठी रोजगार उपलब्ध होणार
पेट्रोलपंप उभारल्यानंतर त्यावरील कर्मचारी हे पोलिस बॉय असतील. त्यासाठी पोलिस बॉयची निवड करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांना या पंपावर नियुक्त्या देण्यात येतील. जर पोलिस बॉय इच्छुक नसतील तर इतर कर्मचाऱ्यांचा विचार केला जाणार आहे.

हवेसह ‘एटीएम’चीदेखील सुविधा
पेट्रोलपंपावर केवळ पेट्रोलचीच सेवा असणार नाही तर या ठिकाणी वाहनांच्या चाकात हवा भरण्यासह ‘एटीएम’ची सुविधादेखील पुरविली जाणार आहे. लवकरच या पंपाचे उद्‍घाटन केले जाणार आहे. 

- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधीक्षक, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मराठी अभिनेत्रीसोबत एका रात्रीसाठी २ लाख; मुंबईत हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; समोर आली धक्कादायक माहिती

Property Tax : कर सवलतीची आजच संधी; मिळकतकर थकबाकीदारांवर उद्यापासून जप्तीची कारवाई

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Vat Purnima Heart Attack Death : पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजला वटवृक्ष; वाण देतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका, सिंधुदुर्गातील 'या' सावित्रीचा दुर्दैवी अंत

Kas Plateau Flower Season : पर्यटकांसाठी मोठी अपडेट! कास पठारावर फुलांचा हंगाम कधीपासून सुरू होणार? यंदा काय असणार खास? वनविभागाची पूर्वतयारी सुरू

SCROLL FOR NEXT