file photo 
मराठवाडा

औंढ्यात मटक्यावर पोलिसांची कारवाई 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; सात आरोपी अटकेत

कृष्णा ऋषी

औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली ) :  येथील जुने बसस्थानक परिसरात दुकानाला पंकज टेलर्स या नावाचा बोर्ड लावून मध्ये तितली भवरा व मिलन नावाचा मटका चालणाऱ्या सेंटरवर रविवारी ( ता. १४ ) दुपारी तीन वाजता पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई करीत ७९ हजार सहाशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सात जणावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील जुने बसस्थानक परिसरात पंकज टेलर्स या नावाचा दुकानाला बोर्ड लावून मध्ये तितली भवरा व मिलन मटका चालू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन सदरील तितली भवरा व मिलन मटक्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली.

हे आहेत आरोपी

या कारवाईत सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये आरोपी अविनाश सुधाकर देशमुख, प्रभाकर लक्ष्‍मण डोने, रामदास देवराव चव्हाण, अंगद रामराव टोम्पे, शेख आतिक शेख बशीर, भगवान किसन आंभोरे, राजू नारायण पोपळघट यांना ताब्यात घेतले मात्र सेंटर मालक गोविंद टोम्पे हा पसार झाला. त्याला लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले. दरम्यान याबाबत श्री. मुढे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. या पथकात श्री मुंडे, हवालदार अफसर पठाण, खिजर पाशा, रवी इंगोले, धोंडबा दिघाडे, राजू सुर्वे, इक्बाल शेख, ओमकार रांजणेकर यांचा समावेश होता. या कारवाईने मटका चालविणाऱ्याना मोठा धक्का बसला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT