Accident on Neknoor Road Beed esakal
मराठवाडा

बीडला बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या गाडीला कारने उडवले; पोलीस जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

हा अपघात आज, रविवारी (ता. ७) सकाळी पावणेसातच्या सुमारास येथील कालिंका मंगल कार्यालयाजवळ झाला.

सकाळ डिजिटल टीम

या अपघाताबाबत नेकनूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास नेकनूर पोलीस (Neknoor Police) करत आहेत.

नेकनूर : नेकनूरमधून बीडला बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या (Sub-Inspector of Police) मोटरसायकलीला भरधाव कारने उडवले. यामध्ये मच्छिंद्र नन्नवरे (Machindra Nannaware) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश नागरगोजे हे गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात आज, रविवारी (ता. ७) सकाळी पावणेसातच्या सुमारास येथील कालिंका मंगल कार्यालयाजवळ झाला. याबाबत अधिक माहिती अशी, नेकनूरचे रहिवासी व सध्या दिंद्रुड पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र श्रीधर नन्नवरे व सिरसाळा पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रमेश धोंडीराम नागरगोजे हे बीडमध्ये बंदोबस्तासाठी होते.

शनिवारी हे दोघे ही मित्र नेकनूर येथे आले होते. आज सकाळी बीडकडे बंदोबस्तासाठी आपल्या मोटरसायकलीवरुन (क्रमांक एमएच २३ एके ९३९७) निघाले होते. घरून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कालिंका मंगल कार्यालयाजवळ पोहोचले असता, मांजरसुंबाकडून नेकनूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने (एमएच २३ बीसी २१०८) त्यांना रॉंग साईडला जाऊन जोराची धडक दिली. यामध्ये दोघेही मोटरसायकलवरून खाली पडले व कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्यात पडली.

यामध्ये मच्छिंद्र नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश नागरगोजे गंभीर जखमी झाले. त्यांना बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत नेकनूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

SCROLL FOR NEXT