political campaign of mahayuti and mva lok sabha election Sakal
मराठवाडा

महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा समारोप

उमरगा : विकास कामांच्या मुद्यापेक्षा धार्मिक, वैयक्तिक टिकेने गाजल्या सभा

अविनाश काळे

उमरगा : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी (ता. पाच) सांयकाळी संपली. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ शिवाजी चौकात तर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पतंगे रोड भागात झाली.

दोन्ही सभेत विकास कामांबाबत नेतेमंडळींनी मोघम बोलत वैयक्तिक टिकेवर भर दिला होता. बिचारे कार्यकर्ते मात्र कडक उन्हामुळे घामांच्या धारांनी बैचेन असल्याने नेतेमंडळींच्या भाषणाकडे फारसे लक्ष दिसत नव्हते.

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या उमेदवार व नेतेमंडळींनी उमरगा, लोहारा विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरुद्ध महायुतीच्या नेतेमंडळींनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

शेवटच्या टप्प्यात जात, धर्मावर बोलत नेतेमंडळींनी मतदारांना भावनिक साद घातली. रविवारी शिवाजी चौकात झालेल्या सभेत राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी खासदार ओमराजेंना "सोंगाड्या"ची उपमा दिली आणि सर्वांगिण विकासासाठी उमरगा तालुका दत्तक घेणार असल्याचे सांगितले.

माजी मंत्री बसवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी आम्ही विकास कामाच्या विचाराने एकत्र आल्याचे सांगुन अर्चनाताई पाटील यांना निवडूण देण्याचे आवाहन केले.

माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी ओमराजेंवर तोफ डागली. नुसते फोन उचलणारा खासदार काय कामांचा असे म्हणत त्यांनी ओमराजेंना "टेलिफोन ऑपरेटर" ची उपमा दिली. या वेळी माजी आमदार व निरीक्षक सुधीर पारवे जितेंद्र शिंदे, सिद्रामप्पा चिंचोळे, संगिताताई कडगंचे, सिध्देश्वर माने, हरिष डावरे आदींची उपस्थिती होती.

संताजी चालुक्य यांनी दिली विकास कामांची हमी

उस्मानाबादच्या विकासासाठी अर्चना पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी जाहीर सभेत केले. ते

म्हणाले की, जिल्ह्यातील रेल्वे च्या सर्वांगीण विकासासाठी, २१ टीएमसी पाणी, उमरगा एमआयडीसी च्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारास निवडून द्या. देशात नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व जगात भारत देश पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी अर्चना पाटील यांना विजयी करावे असे आवाहन चालुक्य यांनी यावेळी केले.

ओमराजेंची भावनिक साद !

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य केले. घराणेशाहीवरही टिका केली. वैयक्तिक टिका करणारे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना ओमराजेंनी चांगलाच हबाडा दिला. पुढच्या घोडे मैदानात बघु ... येथील मतदारच तुम्हाला हद्दपार करेल असा इशाराही त्यांनी दिला.

जनतेशी प्रामाणिक काम केल्याचे सांगत लोकांच्या प्रेमामुळे आपण प्रचंड मताधिक्यांनी निवडूण येण्याचा दावा केला. मतदारांनी मतदानरूपी आशिर्वाद देऊन पुन्हा जनसेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. या वेळी बाबा पाटील, अश्लेष मोरे, रज्जाक अत्तार, ॲड. शीतल चव्हाण, ॲड. सुभाष राजोळे, ॲड. दिपक जवळगे, बाबुराव शहापूरे, संजय पवार, सुधाकर पाटील, अविनाश रेणके, विजय वाघमारे, रणधीर पवार, अशोकराजे सरवदे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT