मराठवाडा

दानवे आणि ठाकरे यांच्यात जुगलबंदी; खोतकरांसह सर्व एकाच व्यासपीठावर

सकाळन्यूजनेटवर्क

जालना : जालन्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय पशू प्रदर्शनाच्या निमित्ताने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी कर्जमाफीवरुन दानवे यांनी ठाकरे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. शेतकऱ्यांनी अनुदानं जमा झाली आहेत हे पाहण्यासाठी घरी जाऊन पासबूक पहावं असा सल्ला दानवे यांनी दिला. तर मला शेतीतलं काही कळत नाही पण शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात असा चिमटा आदित्य ठाकरे यांनी काढला.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मराठवाडा पॅकेज अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दुभती जनावरे विकत घेण्यासाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं भाषण सुरू असताना त्यांनी युती सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली. शिवाय या योजनांचे अनुदान खात्यावर जमा झाल्याचं सांगत 'घरी जाऊन तुमचं पासबुक पाहा'असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. याचवेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे पैसे खात्यावर जमा झाले नसल्याचं सांगत दानवेंना कर्जमाफीची आठवण करून दिली. दरम्यान शेतकऱ्यांची आरडा ओरड लक्षात येताच दानवे यांनी फिरकी घेत हे शेतकऱ्यांचं सरकार असून कर्जमाफी होण्याआधी शेतीत गुंतवणूक वाढली पाहिजे,नंतर कर्जमाफी झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं.

त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या आदित्य ठाकरे यांनी कर्जमाफी आणि पिकविम्याच्या मुद्यावरून टीका करत कर्जमाफी नको,शिवसेनेला शेतकऱ्यांसाठी निवडणुकी आधी कर्जमुक्ती हवी आहे,यासाठी खोतकर तुम्ही आवाज उठवा अशी सूचना खोतकरांना केली. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांची कर्जमाफी आणि कर्जमुक्ती वरून जुगलबंदी दिसून आली.  "मी शहरीबाबू आहे. मला शेतीतलं काही कळत नाही. कोणतं पीक कुठं लावतात तेही कळत नाही. पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसतात, ते पुसण्याचे काम शिवसेना करतेय." असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT